प्रियांका-निकच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, रोमँटिक VIDEO केला शेअर

प्रियांका-निकच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, रोमँटिक VIDEO केला शेअर

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनसच्या (Nick Jonas) लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. 1 डिसेंबर 2018रोजी प्रियांका आणि निक लग्नबंधनात अडकले होते. ‘Nickyanka’च्या लग्नाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूडकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. प्रियंका चोप्रानंही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. प्रियांकानं निकसाठी एक सुंदर भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे. यात तिनं म्हटलंय की, ‘माझे हे वचन आज आणि आयुष्यभरासाठी आहे. तीव्र भावना, प्रेम, आनंद आणि उत्साह या सर्व गोष्टी तू मला एकाच क्षणी दिल्या आहेत. Happy First wedding anniversary Husband. खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार' निक जोनसनंही प्रियंकासाठी अशीच रोमँटिक पोस्ट लिहिली आहे.प्रियंका आणि निकच्या  रोमँटिक पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

(वाचा : शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग)

दोघांची पहिली भेट होती फिल्मी

इंडस्ट्रीचे हॉट कपल प्रियांका आणि निकची लव्ह स्टोरी प्रचंड फिल्मी होती. प्रत्येक प्रेमकहाणीप्रमाणेच या दोघांच्या नात्यातही भन्नाट किस्से घडले आहेत. लग्नापूर्वी जिमी फॉलनच्या ‘शो द टुनाइट’मध्ये निकनं आपल्या लव्ह स्टोरीसंदर्भातील काही मजेशीर किस्से सर्वांसमोर जाहीर केले. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून प्रियंकाची ओळख झाली,असं निकनं सांगितलं. पण या भेटीनंतर गाडी ट्रॅकवर येण्यासाठी तब्बल सहा महिने लागले. या सहा महिन्यात दोघंही मेसेजवरच एकमेकांसोबत संवाद साधत होते. सहा महिन्यांनंतर दोघांनी एकमेकांना भेटण्याचं ठरवलं. या भेटीनंतर अखेर दोघांच्या नात्याची गाडी ट्रॅकवर आली.  पुढे निकनं सांगितलं की, मे 2017रोजी ‘गाला’मध्ये आम्ही दोघं मित्र म्हणून रेड कार्पेटवर एकत्र आलो. आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या-न्-कोणत्या कारणामुळे आमची सतत एकमेकांसोबत भेट होत होती.

(वाचा : सनी लियोनीचा बोल्ड अवतार, व्हिडीओ पाहून चाहत्यांना लागलं वेड)

‘नात्याला संधी देण्याचा निर्णय घेतला’

‘संभाषण आणि कित्येकदा भेटीगाठी झाल्यानंतर आम्ही आमच्या रोमँटिक नात्याला वेगळे वळण देण्याचा निर्णय घेतला. हे सर्व काही खूपच लवकर झालं. पण जे योग्य होतं तेच आम्ही केलं आणि आता आम्ही अत्यंत आनंदित आहोत’, अशी भावना निकनं व्यक्त केली आहे.    

(वाचा : VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल)
दुसरीकडे, प्रियांकाच्या कामाबाबत सांगायचं झालं तर नुकतंच तिनं 'द स्काय इज पिंक' (The Sky Is Pink) सिनेमातून कमबॅक केलं होतं. यामध्ये फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित शराफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. जवळपास तीन वर्षांनंतर प्रियांकानं बॉलिवूडमध्ये घरवापसी केली. याव्यतिरिक्त तिनं 'फ्रोजन 2' (Frozen 2)च्या हिंदी वर्जनसाठी डबिंग केलं होतं.  

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.