प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल

प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल

प्रियांका चोप्रा जोनस आणि निक जोनस सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. सध्या हे दोघं एकमेकांसोबत मियामीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. निक आणि प्रियांकाच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत. प्रियांकाने नुकताच तिच्या 'स्काई ईज पिंक' या बॉलीवूड चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. त्यानंतर कामाचा शीण घालविण्यासाठी निक जोनस आणि प्रियांका मियामीमध्ये क्वालिटी टाईम घालवत आहेत. शिवाय जोनस ब्रदर्सचं सकर गाणं नंबर वनवर पोहचल्याच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठीदेखील ते दोघं मियामीला गेले असावे. कारण काही असलं तरी मियामीमध्ये प्रियांका आणि निक सध्या सुट्टी एन्जॉंय करताना दिसत आहेत. या वेकेशनवर प्रियांका तिच्या हॉट बिकनी लुकमध्ये अगदी स्टनिंग दिसत आहे. काळ्या रंगाच्या हॉट बिकनी लुकमध्ये ती निकसोबत वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटताना दिसत आहे. प्रियांका लग्नानंतर निकसोबत खुष असल्याचं यावरून दिसत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Chilling in Miami 🛥👙🌴


A post shared by Priyanka&Nick (@choprajonas) on
प्रियांका आणि निकचा अनोखा अंदाज


प्रियांका आणि निकसोबत सोफी टर्नर, जोनस ब्रदर्सदेखील या व्हॅकेशनमध्ये त्यांच्यासोबत दिसत आहेत. मियामी मधील फ्लोरीडामध्ये ते निक आणि प्रियांका या सर्वांसोबत त्यांच्या सकर या हिट गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. जोनास ब्रदर्सचा ‘सकर’ अल्बमला जगभरातून अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून हा अल्बम सध्या नंबर 1 म्हणून गाजत आहे. यामध्ये जोनास ब्रदर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सनेदेखील काम केलं आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जोनास परिवार आनंदात आहे.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

When Bollywood music kicks in.. #tareefan #kareenakapoor @sonamkapoor @badboyshah ❤️ @nickjonas @joejonas @sophiet


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
प्रियांका चोप्राचे आगामी चित्रपट


काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक यांचं ‘सकर’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या गाण्यात त्या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री दिसली होती. हे गाणं जोनस ब्रदर्सनी गायलं होतं. शिवाय प्रियांकाचा एक हॉलीवूड चित्रपटदेखील नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं नाव ‘इस इंट इट रोमॅंटिक’ असं आहे. लवकरच ती ‘दी स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर असेल. दी स्काय इज पिंक चित्रपट सोनाली बोस दिग्दर्शित आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि प्रियांका पुन्हा एकत्र काम करणार अशी चर्चा होती. मात्र भारत चित्रपटात काम करण्यास प्रियांकाने ऐनवेळी नकार दिल्यामुळे यापुढे सलमान खान तिच्यासोबत पुन्हा काम करणार नसल्याची शक्यता आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Making hay while the sun shines.. ☀️


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
अधिक वाचा


जेनिफर विगेंटचा खुलासा, करण सिंह ग्रोव्हर सोबत का तोडलं नातं


सारा का ओरडत होती कार्तिकच्या नावाने, व्हिडिओ झाला व्हायरल


नीता अंबानी यांनी सूनमुख पाहून श्लोकाला दिलं 'हे' महागडं गिफ्ट


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम