दिल्लीतील प्रदूषणामुळे प्रियंका झाली हैराण, चाहत्यांना दिला 'हा' सल्ला

दिल्लीतील प्रदूषणामुळे प्रियंका झाली हैराण, चाहत्यांना दिला 'हा' सल्ला

दिल्लीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ज्यामुळे लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाणंदेखील कठीण झालं आहे. दिल्लीत सध्या धुकं आणि प्रदूषणाची चादर परसली आहे. ज्यामुळे दिल्लीत हवेतील प्रदूषणाची वाढ झाली आहे. लोकांना या प्रदूषणात श्वास घेणंही अतिशय कठीण झालं आहे. या प्रदूषणाचा फटका सामान्य लोकांप्रमाणेच अनेक बॉलीवूड सेलिब्रेटीजनांदेखील पडत आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या आगामी चित्रपटासाठी दिल्लीत शूटिंग करत आहे. द व्हाइट टायगर या नेटफ्लिक्सवरील चित्रपटाचं शूटिंग दिल्लीत सुरू आहे.  ज्यामुळे प्रियंकाला दिल्लीतील प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. प्रियंकाने याबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चिंता व्यक्त केली आहे शिवाय चाहत्यांसाठी खबरदारी घेण्याचा सल्लादेखील शेअर केला आहे. 

प्रियंकाने चाहत्यांना दिला हा सल्ला

अभिनेत्री प्रियंका चोप्राने इन्साग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चेहऱ्यावर मास्क लावला आहे, डोळ्यांवर चष्मा घातला आहे. ज्यावरून प्रियंकाला दिल्लीतील प्रदूषणाचा किती त्रास होत आहे हे दिसून येत आहे. प्रियंकाने या फोटोसोबत एक कॅप्शन शेअर केली आहे ज्यामधून तिने तिच्या चाहत्यांना प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे. प्रियंकाने शेअर केलं आहे की, दी व्हाइट टायगरसाठी मी दिल्लीत शूटिंग करत आहे. मात्र या शहरात आता शूटिंग करणं अतिशय कठीण झालं आहे. मला कळत नाही की माणसं या शहरात अशा परिस्थितीत कशी राहू  शकतात. नशीब आमच्याकडे कमीतकमी एअर प्युरिफायर आणि मास्कची सुविधातरी आहे. ज्यामुळे आमचं संरक्षण आम्ही करू शकतो. मात्र ज्यांच्याकडे राहण्यासाठी घरही नाही त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते की त्याचं रक्षण कर. शिवाय मी सर्वांना विनंती करते की, प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि स्वतःच्या घरात सुरक्षित राहा. 

प्रियंकाने मागच्यावर्षीदेखील शेअर केली होती चिंता

मागच्या वर्षीदेखील प्रियंका तिच्या दी स्काय इज पिंकच्या शूटिंगसाठी दिल्लीत आली होती. तेव्हादेखील तिने अभिनेता फरहान अक्तरसोबत मास्क लावून काम करताना फोटो शेअर केला आहे. आता ती राजकुमार रावसोबत दी व्हाईट टायगर या चित्रपटात काम करत आहे. ज्याच्या शूटिंगसाठी तिला पुन्हा या वर्षी दिल्लीत शूटिंग काम करत आहे. यासोबत हॉलीवूड प्रोजेक्टवरदेखील काम करत आहे. 

अभिनेता अर्जून रामपालने केलं ट्वीट

अभिनेता अर्जून रामपालदेखील दिल्लीतील या खराब वातावरणाचा त्रास सहन करत आहे. अर्जूनने याबाबत ट्वीट करून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. अर्जूनने केलं आहे. आताच मी दिल्लीत पोहचलो आहे. आज दिल्लीतील हवा मुळीच योग्य नाही आहे. दिवसेंदिवस या शहराची अवस्था खराब होत चालली आहे. डोळ्यांनीदेखील तुम्ही हे प्रदूषण पाहू शकता. कारण चारही बाजूने प्रदूषणाची चादर पसरली आहे. लोकांनी मास्क घालून फिरणंच योग्य आहे. दिल्लीला वाचवण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

युवा सिंगर एक नंबर मध्ये या पाच स्पर्धकांमध्ये रंगणार स्पर्धा

मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे चित्रीकरण झाले पूर्ण

महाराष्ट्राचा इतिहास घडवणारी सप्तपदी