प्रियांकाला लागले संघाचे वेड, प्रियांकाच्या नव्या फोटोनंतर लोकांमध्ये चर्चा

प्रियांकाला लागले संघाचे वेड, प्रियांकाच्या नव्या फोटोनंतर लोकांमध्ये चर्चा

सोशल मीडियावर ट्रोलिंगचे सत्र सुरुच असते. आता पुन्हा एकदा प्रियांका चोप्रा चर्चेचा विषय झाली आहे. प्रियांकाला संघाचे वेड लागल्याच्या कमेंट प्रियांकाच्या फोटोवर केल्या असून सध्या तिचा हा फोटो चांगला व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत नीक जोनस दिसत असून आता प्रियांकाला खरंच संघाचे वेड लागले आहे की नाही ते तुम्हीच या फोटोवरुन ठरवा.तुम्हाला या फोटोबद्दल काय वाटते ते आम्हाला सुद्धा नक्की कळवा

पाहा फोटो

Twitter

कोणी केला हा फोटो व्हायरल

प्रियांकाचा हा फोटो एका ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. नुकताच प्रियांकाने भारत दौरा केला आणि पुन्हा अमेरिकेला परतली. तिने कामाला लगेचच सुरुवात केली. ती नीकसोबत जेव्हा बाहेर पडत होती तेव्हा तिचा हा फोटो काढण्यात आला. या फोटोमध्ये ती खाकी रंगाच्या हाफ पँटमध्ये दिसत आहे. आता खाकी पँट म्हटल्यावर RSS ची आठवण येणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच हा फोटो शेअर करताना प्रियांका RSS च्या मिटींगमधून बाहेर पडताना अशी कॅप्शन लिहिल्यानंतर लोकांना आयतं कोलीत मिळणं स्वाभाविक होतं. मग काय प्रियांकाच्या या फोटोवर एकापेक्षा एक विनोदी अशा कमेट येऊ लागल्या आहेत. आता प्रियांकाच्या फोटोवर किंवा स्टाईलवर अशा कमेंट येणेही नवीन नाहीत. पण या कमेंट नया है यह अशाच म्हणाव्या लागतील. सध्या ट्विटरवर या फोटोची चर्चा होत आहे. पण ती लवकरच अन्य सोशल माध्यमांवर होईल हे मात्र नक्की

कमेंटचा पडला पाऊस

आता असा फोटो शेअर केल्यानंतर लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर जागा होण्यावाचून राहतोय. लोकांना त्या हाफ पँटच्या फोटोवर अशी काय कमेंट करायला सुरुवात केली की, तुम्हालाही हसू आल्यावाचून राहणार नाही. प्रियांकाच्या या फोटोवर Nagpur version of Priyanka किंवा आता अमेरिकेतही Rssसुरु करण्यात येईल अशा काही कमेंट करण्यात आल्या आहेत. शिवाय एकाने RSS बदलली पण प्रियांका नाही असा टोमणा देखील देण्यात आला आहे

वाचा नेमकं काय म्हणालेत नेटीझन्स

प्रियांकाच्या फॅशनवर असते जगाची नजर

Instagram

प्रियांकाचा फॅशन अंदाज काहीतरी वेगळाच आहे. तिच्या प्रत्येक लुकची चर्चा होते. तिची हेअरस्टाईल, तिचे कपडे, तिचे शूज, तिच्या अगदी सगळ्याच गोष्टी फॉलो केल्या जातात. त्यामुळेच एअरपोर्टवर, फॅशन इवेंट्समध्ये काय घालते. हे लोकांसाठी विशेषत:तिच्या फॉलोवर्ससाठी महत्वाचे असते.नुकत्याच झालेल्या MetGala 2019 मध्ये तिने केलेला तिचा लुकही खूप ट्रोल झाला. प्रियांकाच्या डोक्यावर चिमणीणे घरटे बांधल्यापासून ते अगदी वेगवेगळ्या उपमा तिला त्या फोटोला देण्यात आल्या. पण तरीही प्रियांकाने अगदी कशाचीही तमा न बाळगता तो लुक चांगला कॅरी केला.

आणखी एका ठिकाणी उभारणार प्रियांकाचा पुतळा

सिनेतारकांच्या वॅक्स स्टॅच्यूमध्ये प्रियांकाचा मेणाचा पुतळा आधीच तयार करण्यात आला आहे. सिंगापूर, न्यूयॉर्क येथील संग्रहालयात मेणाचे पुतळे आहेत.पण आता तिचा पुतळा लंडन येथील मादाम तुसाद येथे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रियांका आता आणखी एका ठिकाणी पाहायला मिळणार आहे.दीपिका पदुकोणनंतर प्रियांकाचा हा पुतळा लंडन येथील वॅक्स म्युझिअममध्ये तयार करण्यात येणार आहे. प्रियांका सध्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसणार आहेत. पण या शिवाय ती अनेक प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे.