प्रियांका चोप्रा आणि निक जोनस लग्न झाल्यापासून नेहमीच चर्चेत असतात. प्रियांका आणि निक अगदी लोकांमध्येही आपलं प्रेम व्यक्त करायला लाजत नाहीत. अगदी मनापासून दोघंही आपलं प्रेम व्यक्त करतात. रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सोशल मीडियावर यांचे फोटो व्हायरल होत असतात. नुकतेच निक आणि प्रियांका व्हेकेशनवर गेले असून प्रियांकाने नेहमीप्रमाणे आपल्या अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघेही मजेत दिसत असून आपली सुट्टी योग्य प्रकारे कशी एन्जॉय करायची हेच प्रियांकाने दाखवून दिलं आहे. प्रियांका आणि निक एकमेकांबरोबर क्वालिटी टाईम घालवत असून प्रियांकाने आपले काही स्विमसूटमधील HOT फोटो पोस्ट केले आहेत. जे सध्या तिच्या चाहत्यांना खूपच आवडत असून व्हायरल होत आहेत.
प्रियांकाचे हे फोटो काढले आहेत निकने
फ्रान्सपासून ते अगदी इटलीपर्यंत फिरणाऱ्या प्रियांका आणि निकचे हे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण प्रियांकाचा स्विमसूटमधील अंदाज चाहत्यांना अधिक चांगला वाटत असल्याचं दिसून येत आहे. प्रियांकाने आपल्या या सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटला आहे हे तिच्या फोटोंवरून लक्षात येत आहे. या फोटोंमध्ये प्रियांकाने क्रिम कलरची बिकिनी घातली आहे. तर हातामध्ये ड्रिंक्सचा ग्लास आहे. या फोटोंमध्ये दिलेल्या पोझमुळे प्रियांका नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस आणि सेक्सी दिसत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व फोटो तिचा नवरा आणि प्रसिद्ध गायक निक जोनसने काढले आहेत. तिचा हा बोल्ड लुक निकने आपल्या कॅमेऱ्यामध्ये साचेबद्ध केला आहे. हे फोटो पोस्ट केल्यानंतर प्रियांकानेही अगदी दिलखुलासपणे कॅप्शन देत आपल्या नवऱ्याचं कौतुक केलं आहे. ‘सुट्टीचा योग्य वापर. नवरा काढत आहे फोटो’ असं मजेशीर कॅप्शन प्रियांंकाने या फोटोला दिलं आहे. निक नेहमीच प्रियांकाची काळजी घेत असून तिच्यावरील त्याचं प्रेम त्याच्या वागण्यातून दिसून येतं.
निक आणि प्रियांकाचा रोमँटिक डान्स
इतकंच नाही या फोटोपूर्वी निकने एक व्हिडिओदेखील पोस्टे केला होता. ज्यामध्ये प्रियांका आणि निक दोघंही अगदी मोकळ्या आकाशाखाली रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. निक आणि प्रियांका नेहमीच एकमेकांबरोबर आनंदी दिसतात. एकमेकांबरोबरील वेळ ते खूपच चांगला घालवत असून दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत. निक नेहमीच प्रियांकासाठी अशा डेट अरेंज करत असतो. काही दिवसांपूर्वीच दोघांनी मिळून डिनर डेट प्लॅन केली होती आणि यामध्ये एकमेकांनी जेवण बनवून या डिनर डेटचा आनंद लुटला होता. दरम्यान नुकतेच दोघेही पॅरिसला सोफी टर्नर आणि जो जोनस यांच्या लग्नाला गेले होते. त्यावेळीदेखील दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.
बऱ्याच कालावधीने प्रियांका दिसणार बॉलीवूडपटात
प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच भारतात येऊन गेली. फरहान अख्तरबरोबर तिचा येणारा सिनेमा ‘द स्काय इज पिंक’चं शूटिंग पूर्ण करून प्रियांका पुन्हा तिच्या सासरी गेली. प्रियांका बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा बॉलीवूडपटात दिसणार आहे. या सिनेमामध्ये झायरा वासिमचीही महत्त्वाची भूमिका आहे. तर निकचे गाण्याचे शो जगभर चालू असतात. सध्या जोनस ब्रदर्सचा अल्बम खूपच प्रसिद्ध झाला असून या बँडला जगभरातून ऐकण्यासाठी बोलावण्यात येत असल्याचंही दिसून येत आहे.
हेदेखील वाचा –
प्रियांका चोप्रा तिच्या लुकमुळे पुन्हा एकदा झाली ट्रोल
प्रियांकाला समुद्रात पडण्यापासून वाचवलं निकने, व्हिडिओ होतोय व्हायरल
Prinick Lovestory: प्रियांकाच्या प्रेमाची गोष्ट