प्रियांका आणि निकचा मेट गाला (Met Gala 2019) कार्पेटवर पुन्हा एकदा जलवा

प्रियांका आणि निकचा मेट गाला (Met Gala 2019) कार्पेटवर पुन्हा एकदा जलवा

प्रियांकाचं आयुष्य मेट गाला 2017 पासून पूर्णच बदललं. याच मेट गालामध्ये निकची आणि तिची भेट झाली आणि दोन वर्षात आता दोघेही एकत्र आले आहेत. मेट गालामध्ये प्रियांकाचा लुक काय असणार याकडे सगळयांचंच लक्ष होतं. तर आज सकाळपासून संपूर्ण सोशल मीडिया प्रियांका आणि निकच्या लुकमुळे भरून गेलं आहे. अर्थातच यामध्ये दीपिका पादुकोड आणि कॅटी पेरीनेदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते प्रियांकाच्या लुकने. अगदीच वेगळा लुक यावेळी प्रियांकाने केला आहे. त्यामुळे प्रियांका आणि निकचा जलवा पुन्हा एकदा मेट गालाच्या कार्पेटवर पुन्हा एकदा दिसून आला आहे.


क्रेझी लुक


Met Gala 1


या मेट गाला कार्पेटमध्ये नेहमीच सर्व हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील काही स्टार्स वेगळ्या आणि क्रेझी लुकमध्ये दिसून येतात. न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटिन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटकरिता वर्षभरातून एकदा पैसे जमवण्यासाठी मेट गाला हा कार्यक्रम करण्यात येतो. हा अतिशय मानाचा कार्यक्रम असून यामध्ये विविध सेलिब्रिटी सहभागी होऊन वेगवेगळ्या फॅशन्स दुनियसमोर आणत असतात. गेले तीन वर्ष प्रियांका चोप्राची या कार्यक्रमामध्ये वर्णी लागत असून तिच्या लुकची अगदी पहिल्या मेट गाला पासून चर्चा होत आहे. 2017 ला प्रियांकाने केलेला लुक तसंच गेले दोन वर्ष आणि हे वर्ष असा प्रत्येक लुक हा प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावेळी तिने राल्फ लॉरेनचा डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. पण यावेळी प्रियांकाने केलेला लुक हा अगदीच वेगळा असून यामध्ये प्रियांकाला ओळखणंदेखील कठीण झालं आहे. थाय हाय - स्लिट गाऊनमध्ये प्रियांकाने सगळ्यांनाच चक्राऊन सोडलं. तिचा मेकअप आणि हेअरलुकदेखील या वेळी अतिशय लाऊड आहे. अर्थात या कार्यक्रमासाठी हा लुक स्टनिंग असला तरीही प्रियांका या लुकमुळे सध्या ट्रोल होत असून तिच्यावर अनेक मीम्सदेखील बनवले जात आहेत.


प्रियांका आणि निकचा लुक केला Dior ने डिझाईन


Met Gala 3


प्रियांका आणि निक नेहमीच आपल्या लुकसाठी चर्चेत असतात. यावेळी मेट गाला 2019 ची थीम Camp: Notes on Fashion अशी ठेवण्यात आली आहे. त्यानुसार निक आणि प्रियांकाने आपले कपडे निवडले असून यावेळी त्यांचे कपडे प्रसिद्ध ब्रँड Dior ने डिझाईन केले आहेत. दरम्यान या दोघांनीही स्पार्कल फुटवेअर या ड्रेसखाली घातले असून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रियांकाने संपूर्णतः एक ड्रॅमॅटिक लुक परिधान केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रियांकाने आपल्या लुकमध्ये सिल्व्हर पंप्स आणि पर्पल ड्रॉप इअररिंग्ज, मल्टी लेअर पेंड्ट्स घालून त्याला अधिक बोल्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हेअरडोमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिने त्यावर सिल्व्हर केज क्राऊन लावला असून एक वेगळा लुक दिला आहे.


Met Gala 2


प्रियांकावर आले अनेक मीम्स


कोणत्याही गोष्टीवर आजकाल लगेच मीम्स येणं सुरु झालं आहे. प्रियांकाचा मेट गालाचा लुक आल्यावर लगेचच मीम्स यायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारचे मीम्स बनवण्यात आले आहेत की, हसून हसून पोट दुखावं. प्रियांकाची ‘थ्री इटियट्स’ मधील व्हायरसबरोबर तुलना करण्यात आली आहे, तर एका मीममध्ये अरारारा गाणं फेम प्रवीण तरडेबरोबरही तिचा फोटो लावण्यात आला आहे. कोणाच्या डोक्यात सध्या काय येईल हे सांगता येत नाही. पण तरीही प्रियांकाने केलेला लुक हा तिने तिच्या परीने अतिशय आत्मविश्वासाने कॅरी केला आहे असं म्हणावं लागेल. शिवाय निक जोनसनेही तिला साजेशी साथ दिली आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


देसी गर्ल प्रियांका दिसू शकते ‘मार्व्हल’स भूमिकेत


प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल