प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न 'या' कारणामुळे लांबणीवर

प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न 'या' कारणामुळे लांबणीवर

प्रियांका चोप्राच्या लग्नानंतर अगदी लगेचच तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याचा त्याच्या गर्लफ्रेंड ईशिता कुमारबरोबर रोका म्हणजेच साखरपुडा झाला. या समारंभासाठी खास प्रियांका आणि चोप्रांचा जावई निक जोनस आले होते. पण मागच्याच आठवड्यात ही देसी गर्ल पुन्हा भारतात आली आणि चर्चांना उधाण आलं की, ती तिच्या भावाच्या लग्नासाठी भारतात आली आहे. पण सगळंच बिनसल्यासारखं वाटलं जेव्हा सिद्धार्थची गर्लफ्रेंड ईशिताने तिचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला. मग चर्चा सुरू झाली ती देसी गर्लच्या भावाचं लग्न मोडल्याची.


लग्न मोडलं की लांबणीवर


1 siddharth chopra wedding ishita kumar hospitalized


सूत्रानुसार, सिद्धार्थची गर्लफ्रेंड आणि होणारी बायको ईशितावर नुकतीच छोटी सर्जरी झाली. त्याबद्दलची पोस्टही तिने इन्स्टावर शेअर केली.




 

 

 


View this post on Instagram


 

 

Recovering from surgery 💉🤯 Very painful but glad it's over 🙏


A post shared by Ishita Kumar (@ishittaakumar) on




सिद्धार्थचं लग्न फिसकटल्याच्या चर्चांना तेव्हा उधाण आलं जेव्हा पीसीने ईशिताला इन्स्टावर अनफॉलो केलं. कारण हे लग्न म्हणे मागच्या वीकेंडला होणार होतं. पण ईशिताच्या सर्जरीमुळे ते पुढे ढकललं गेलं.


2 siddharth chopra wedding roka ceremony


एका वृत्तपत्रानुसार, सिद्धार्थ आणि ईशिताचं लग्न मोडल्याच्या अफवा खोट्या आहेत. ईशिताची आत्ताच सर्जरी झाली असल्यामुळे दोन्ही कुटुंब पुढच्या मुहूर्ताच्या शोधात आहेत.


3 siddharth chopra wedding roka ceremony


सिद्धार्थ चोप्राची रोका सेरेमनी यावर्षी February 27 ला झाली होती. तेव्हा देसी गर्ल प्रियांकाने ईशिताचं चोप्रा कुटुंबात स्वागत करत क्युट कॅप्शनही इन्स्टावर दिलं होतं.





पहिल्यांदाच नाही मोडलं सिद्धार्थचं लग्न


सिद्धार्थचं लग्न मोडल्याची ही पहिलीच वेळ नाही. तुम्हाला माहीत आहे का ? या आधी सिद्धार्थचा साखरपुडा त्याची गर्लफ्रेंड कनिका माथूरसोबत झाला होता. त्यांचा साखरपुडा अगदी खाजगीरित्या ऑक्टोबर 2014 ला झाला होता. त्याचं डेस्टीनेशन वेडींग गोव्यात फेब्रुवारी 2015 ला होणार होतं.


4 siddharth chopra wedding kanika mathur


कनिका आणि सिद्धार्थ एकमेंकाना तीन वर्ष डेट करत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. पीसी आणि तिचा भाऊ दोघंही गोव्याला लग्नाच्या तयारीसाठीही गेले होते. पण तेव्हाही काही आठवड्यानंतर सिद्धार्थने इन्स्टावर सिंगल असल्याची पोस्ट टाकली आणि सगळेच पुन्हा कन्फ्यूज झाले.


प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याची बातमी खरी आहे का?, आईने सांगितलं सत्य


5 siddharth chopra wedding ishita kumar


असो नशिबाने वेगळं काहीतरी ठरवलं असावं. आम्ही आशा करतो की, ईशिता लवकर बरी व्हावी आणि सिद्धार्थच्या आयुष्यात लवकरच हॅपी एडींग यावी.