प्रियांका चोप्राची घोडदौड सुरूच, शिरपेचात नवा मानाचा तुरा

प्रियांका चोप्राची घोडदौड सुरूच, शिरपेचात नवा मानाचा तुरा

प्रियांका चोप्रा हे बॉलीवूड आणि भारतातील असं एक नाव आहे जे जगभरात गाजत आहे. प्रियांकाने नेहमीच आपल्या भारताचं नाव हे मोठं केलं आहे. आतापर्यंत जगभरात प्रियांकाचे अनेक चाहते तर आहेतच पण तिने अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात खोवले आहेत हे नाकारता येत नाही. आता अजून एक मान प्रियांका चोप्रा जोनसला मिळाला आहे. प्रियांका चोप्रा ही सर्वात प्रसिद्ध आणि अप्रतिम अभिनेत्री आहे. केवळ बॉलीवूड नाही तर हॉलीवूडवरदेखील गाजवत आहे. तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रियांका जोनस ब्रदर्सच्या अनेक व्हिडिओमध्येदेखील दिसली आहे. आता प्रियांकाला ‘क्रिएट अँड कल्टिव्हेट’ (Create and Cultivate’s) यादीमध्येही स्थान मिळालं आहे. तिला 100 च्या आत या यादीमध्ये स्थान मिळालं असून यशस्वी आणि प्रेरणात्मक महिलांच्या यादीमध्ये प्रियांकाने आपलं स्थान पक्कं केलं आहे. प्रियांका चोप्राने स्वतः या गोष्टीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. 

घटस्फोटाची बातमी दिल्याबद्दल प्रियांका आणि निक करणार मासिकाविरूद्ध कारवाई

सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद केला व्यक्त

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ही आनंदाची बातमीदेखील तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपला एक फोटो शेअर करत प्रियांकाने आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘मला क्रिएट आणि कल्टिव्हेट 100 एंटरटेनमेंट कॅटेगरीच्या टॉप 100 यादीमध्ये आणण्यासाठी आपल्या सर्वांचे आभार’ अशा स्वरूपाचं कॅप्शन लिहित प्रियांकाने आपल्या चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत. प्रियांका चोप्रा ही जमिला जमील, मेरी कोंडो आणि टायरा बँक्स यासह 9 अभिनेत्रींसह या गटात सामील झाली आहे. ही तिच्यासाठीच नाही तर भारतासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. तिच्या या घोषणेनंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदाचा वर्षाव केला आहे. 

प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या

निकच्या एक्स गर्लफ्रेंडचंही यादीत नाव

View this post on Instagram

#GoldenGlobes2020 💗 @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांकाशिवाय या यादीमध्ये तिचा नवरा निक जोनसच्या एक्स गर्लफ्रेंड ओलिव्हिया कल्पोचं पण नाव समाविष्ट आहे. तिने या यादीत ‘कंटेट क्रिएटर’ या गटामध्ये स्थान मिळवलं आहे. निक आणि ओलिविया हे दोन वर्ष एकमेकांना डेट करत होते आणि 2015 मध्ये दोघं वेगळं झाले. त्यानंतर 2017 मध्ये प्रियांकाशी निकची भेट झाली आणि त्याने एक वर्षातच एकमेकांशी लग्न केलं. 

 

जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते

प्रियांका रमली हॉलीवूडमध्ये

प्रियांका लग्नानंतर हॉलीवूडमध्येच रमली आहे. पण ती सतत भारतात येत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने ‘द स्काय इज पिंक’ नावाचा चित्रपटही केला. आपल्या करिअरच्या शिखरावर असताना लग्नाचा निर्णय आणि भारतातून शिफ्ट होण्याचा निर्णय हा प्रियांकासाठी नक्कीच सहज नव्हता. तिने एका मुलाखतीमध्ये याविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. आपल्या खासगी आणि व्यावसायिक या दोन्ही गोष्टींसाठी तिने हा निर्णय घेतल्याचंही तिने सांगितलं होतं. प्रियांका सध्या एकामागोमाग एक यशाची शिखरं पार करत आहे. तिच्या चाहत्यांसाठी यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट नक्कीच काही नाही. तिला नेहमी बॉलीवूडमध्येही बघण्याची इच्छा तिच्या चाहत्यांची आहे. त्यामुळे आता पुढे कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये प्रियांका दिसणार याचीही उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. प्रियांकाचेही कोणतेही प्रोजेक्ट असले तरीही तिला बॉलीवूडमध्ये बघण्यासाठी तिचे चाहते अधिक उत्सुक आहेत हे नक्की.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.