प्रियांकाच्या त्या ड्रेसवरची चर्चा काही थांबेना... मीम्स काही आवरेना

प्रियांकाच्या त्या ड्रेसवरची चर्चा काही थांबेना... मीम्स काही आवरेना

प्रियांका चोप्रा…. जोनस झाल्यापासून प्रत्येक दिवस चर्चेत असते. या too cute वाटणाऱ्या जोडीते अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रियांका नीकपेक्षा 10 वर्षांनी मोठी असली तरी तिच्या ड्रेसिंगसेन्स आणि अदांमुळे ती अनेकांना घायाळ करते यात काही वाद नाही. पण या ड्रेसिंगच्या बाबतीत तिचे गणित अनेकदा चुकले आहे. काहीतरी चांगले करण्याच्या प्रयत्नात प्रियांका अशी काही फॅशन करुन बसते की, तिच्या त्या कपड्यांवर लुकवर प्रदीर्घ चर्चा रंगू लागते. आता नवीन काहीतरी सांगायचं तर प्रियांकाचा grammy मधला plunge neck गाऊन… हा गाऊन घालून ती सगळ्यांमध्ये इतकी उठून दिसली की, तिच्यावरच नेटीझन्स सध्या जोरदार चर्चा करताना दिसत आहेत.

मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमीचा ऑफस्क्रीन लुक

कुछ तो लोक कहेंगे… पर थोडा ज्यादा

Instagram

आता जर तुम्ही अजुनही प्रियांकाचा हा ड्रेस पाहिला नसेल तर हा आहे प्रियांकाचा तो गाऊन ज्यावर सध्या जोरदाक चर्चा होताना दिसत आहे. प्रियांकाने  Grammy award साठी हा महागडा plunge neck ड्रेस निवडला होता. हा नेक खूपच डीप होता. तिच्या बेंबीपर्यंत त्याचा गळा असल्यामुळे ती अर्धनग्न असल्याचीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. तिच्या या ड्रेसवर लोकांनी इतक्या प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये सेलिब्रिटीही काही मागे नाहीत. त्यांनीही प्रियांकाच्या या ड्रेसवर प्रतिक्रिया दिली आहे.काहींनी प्रियांकाच्या ड्रेसमधून झळकणाऱ्या शरीरावर इतकी टीका केली आहे की वाचतानाही लाज वाटेल. तर प्रियांकाच्या काही फॅन्सनी मात्र तिला अशाप्रकारचे कपडे तुझ्यासाठी नाही असे अगदी स्पष्टपणे सांगणे पसंत केले आहे. प्रियांकाच्या या ड्रेसवर इतके मीम्स आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या मीम्सवर अधिक चर्चा रंगू लागल्या आहेत. 

नीकच्या दातात अडकले पालक

आता प्रियांकाचा हा ड्रेस गॉसिपचे कारण बनल्यानंतर नीकचा एक फोटोही चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये नीकच्या दाढेत काहीतरी अडकलेले दिसत आहे. नीक तू रात्री जेवणात पालक खाल्लं होत का? यापासून या चर्चेला सुरुवात झाली आहे. नीकचा Grammy Awards मधील परफॉर्मन्स राहिला बाजूला पण या दाढेत अडकलेल्या गोष्टीने संपूर्ण इंटरनेट वापरणाऱ्यांना चर्चेसाठी उद्युक्त केले. प्रियांकाने तिच्या ड्रेसवर काहीही बोलणे पसंद केले नसले तरी नीकने मात्र यावर उत्तर दिले तो म्हणाला की, मी किमान भाज्या खातो हे तरी कळले असेल. आता या उत्तरावर त्याचे फॅन्स जबरदस्त खूश झाले. पण हेटर्स आणखी काही मीम्स करण्याची संधी नक्कीच मिळाली.

लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार

बस्स झालं आता पुरे!

 आता Grammy Award घेऊन लोकं घरी गेली. त्याची एका दिवसाची असलेली चमकही उतरली पण प्रियांका आणि नीकच्या कपडयांचे मीम्स थांबायचे काही नाव घेत नाही.  दररोज किमान 50 तरी मीम्स बनून ते इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता तरी पुरे झालं असं म्हणायची वेळ आहे. बाकी मीम्स म्हणाल तर ते तुम्हालाही पटतील असेच आहे.


एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर प्रियांका थांबेल असे काही सांगता येत नाही. कारण ती कमेंटला घाबरुन कधी थांबली आहे असे आतापर्यंत कोणीच पाहिले नाही.


#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/