देसी गर्ल प्रियांका दिसू शकते ‘मार्व्हल’स भूमिकेत

देसी गर्ल प्रियांका दिसू शकते ‘मार्व्हल’स भूमिकेत

प्रियांका चोप्रा जोनासने हॉलीवूड चांगलचं गाजवलंय. याची सुरूवात झाली ती प्रियांकाच्या डेब्यू सीरिज क्वांटीको (Quantico) ने 2015 साली. तेव्हापासून तिच्या अभिनयाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा आलेख चढताच राहिला आहे. आता तिच्या अभिनयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

My first ever #jonasbrothers show. And it was incredible!!! I’m so proud of these guys!! #Family ❤️🎉🙌🏽


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
सूत्रानुसार, प्रियांका लवकरच मार्व्हल सुपरहिरो कमाला खानच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मार्व्हलच्या कॉमिक बुकमधील सुपरहीरो कमाला खानला रूपेरी पडद्यावर आणण्याची चर्चा आहे. या भूमिकेसाठी प्रियांका चोप्राचं नाव चर्चेत आहे.    
 

 

 


View this post on Instagram


 

 

It’s here!! Go watch go watch! Link in bio☝🏼 #JustOneThing @youtube


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
सध्या ए आर रहमान यांनी एव्हेंजर्स एंड गेमसाठी बनवलेल्या अँथम रिलीजसाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक जो रूसो भारत दौऱ्यावर आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by @arrahman on
त्यांच्या हस्ते या अँथमचं रिलीज करण्यात आलं. त्यावेळीच या चर्चांना उधाण आलं आहे की, रूसो हे प्रियांकासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकतात.
 

 

 


View this post on Instagram


 

 

🍬 #reddress


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
सूत्रानुसार, रूसो यांची टीम प्रियांका चोप्राशी याबाबत चर्चा करत आहे. याबाबत रूसो यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘आम्हाला नक्कीच प्रियांकासोबत काम करायला आवडेल. आमची याबाबत चर्चा सुरू असून ते नक्की कोणत्या प्रोजेक्टबद्दल आहे ते आता सांगू शकत नाही.’ आता ही नक्की कमाला खानची भूमिका आहे की, मार्व्हलच्या आगामी ‘इटर्नल्स’मध्ये प्रियांकाचा समावेश होणार हे लवकरच कळेल.
 

 

 


View this post on Instagram


 

 

To live for days like this. ❤️ @nickjonas #boatlife


A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on
दुसरीकडे ही बातमी 1 एप्रिलला व्हायरल झाल्याने अनेकांना यावर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न पडला होता. हम्मम्म... आता होण्यासाठी काहीही होऊ शकतं. प्रियांकाला सुपरहीरोच्या रूपात पाहण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत.


priyanka chopra - marvel superhero
प्रियांका लवकरच 'द स्काय इज पिंक' या बॉलीवूड चित्रपटात फरहान अख्तर आणि झायरा खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित असून यांच्या निर्मितीमध्येही प्रियांकाचा सहभाग आहे.


हेही वाचा -


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल


जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते


प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या