प्रियांकालाही आई होण्याचे वेध... वाचा काय म्हणाली प्रियांका चोप्रा जोनस

प्रियांकालाही आई होण्याचे वेध... वाचा काय म्हणाली प्रियांका चोप्रा जोनस

अभिनेत्री कल्की केकलाने आई होण्याची आनंदाची बातमी दिल्यानंतर आता बॉलीवूडची देसी क्वीन आणि क्वाटिंगोस्टार प्रियांका चोप्रा हिच्या आई होण्यावर चर्चा होऊ लागली आहे. प्रियांका आई कधी होणार असा प्रश्न ज्यावेळी तिला मुलाखतीत विचारण्यात आला त्यावेळी तिने हा प्रश्न खासगी किंवा त्यावर मी उत्तर देऊ शकत नाही असे कसलेही आढेवेढे न घेता तिने या प्रश्नाचे अगदी बिनधास्त उत्तर दिले आहे. प्रियांकाला आई व्हायचे आहे पण…

कतरिनाबरोबर झळकतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री, चाहत्यांनी केला अभिनंदाना वर्षाव

 

काय म्हणाली प्रियांका

Instagram

एका मुलाखती दरम्यान प्रियांकाला प्रेग्नंसी,आई होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रियांका म्हणाली की, माझ्या आयुष्याची ध्येय ठरलेली आहेत. मला नक्कीच एक दिवस आई व्हायचे आहे. पण त्या आधी मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर मी हा निर्णय घेईन. ती पुढे म्हणाली की, माझे आयुष्य सध्या एका सुटकेसप्रमाणे आहे. मी एका जागी स्थिर नाही. बॉलीवूड आणि हॉलीवूड असे करता करता माझा बराच वेळ हा घराबाहेर जातो. मला एक घर घ्यायचे आहे. त्यानंतर मी याचा विचार करु शकेन. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर तुम्हाला त्याग करावा लागतो. मेहनतीशिवाय तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. त्यामुळे मला सगळ्याचा विचार करायचा आहे.

गंगाजलनंतर सोडली मुंबई

Instagram

प्रियांका चोप्राने अनेक दर्जेदार चित्रपट हिंदीत केले आहे. तिचा अभिनय नेहमीच खास राहिला आहे. पण गंगाजल या चित्रपटानंतर 2016 साली तिला क्वाटिंकोमधून ऑफर आली. त्यानंतर ती बेवॉच या चित्रपटात दिसली होती. यात तिने विक्टोरिया नावाची महत्वाची भूमिका केली होती.  त्यामुळे आता ती तेथे चांगली रुळली आहे. तिने तेथील अनेक टेली शो मध्ये अपिअरंस दिला आहे. 

निक जोनससोबत केले लग्न

प्रियांका सध्या 37 वर्षांची असून तिने अमेरिकेचा पॉप गायक निक जोनससोबत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले. नीक आणि तिच्या वयामध्ये अंतर असूनही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमेरिका आणि मुंबईत त्यांचा हा दिमाखदार सोहळा पार पडला. काही खास लोकांच्या उपस्थित हा सगळा सोहळा पार पडला. भारतीय आणि ख्रिश्चनपद्धतीने हा सगळा सोहळा पार पडला.

निक ठरला लकी

निक जोनस हा अमेरिकेतील पॉप सिंगर म्हणून प्रसिद्ध आहे. पण प्रियांकाच्या भेटीनंतर त्याचे भाऊ गाण्यासाठी पुन्हा एकत्र आले. निक जोनस चे भाऊ जो आणि केवीन यांचा बँड जोनसब्रदर्स हा काही कारणामुळे वेगळा झाला होता. पण प्रियांकाचा पायगुण चांगला की, हे भाऊ पुन्हा एकत्र आले आणि त्याने पुन्हा धुव्वाधार सुरुवात केली. SUCKER हे त्यांचे गाणे बिलबोर्डवर पहिल्या क्रमांकावर आले. 

अभिनेत्री रेशम टिपणीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर

आता जोनसला लकी ठरलेली प्रियांका आपली सगळी स्वप्न पूर्ण करुन कधी आई होण्याचा निर्णय घेते ते पाहावे लागेल. पण सध्या ती ‘स्काय इज पिंक’ आणि तिच्या अन्य प्रोजेक्टला समर्पित आहे

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.