प्रियांका चोप्राला सासरी मिळतेय ‘अशी’ वागणूक, लग्नानंतर तीन महिन्यांनी केला खुलासा

प्रियांका चोप्राला सासरी मिळतेय ‘अशी’ वागणूक, लग्नानंतर तीन महिन्यांनी केला खुलासा

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आहे. प्रियांका सोशल मीडियाच्या माध्यमातून  सतत तिचे आणि निकचे फोटो शेअर करत असते. प्रियांका आणि निक दोघंही एकमेकांच्या प्रेमात अगदी बुडाले असल्याचं या फोटोंमधून दिसत असते. बऱ्याचदा ती तिच्या सासरच्या कुटुंबियांचे फोटोदेखील शेअर करते. निक जोनसला तीन भाऊ आहेत. त्यांची फॅमिली मोठी असून सर्वजण अगदी आनंदाने राहतात. जोनस भावंडांमध्ये चांगलं बॉडिंग दिसून येतं.


priyanka-chopra-nick-jonas-family-secret-revealed


निक ब्रदर्सनी केला खुलासा


प्रियांका आणि निकच्या लग्नानंतर काही दिवस जोनस कुटुंबातील एका सदस्याला प्रियांका आवडत नसल्याचं खुद्द जोनस कुटुंबाने उघड केलं आहे. इंग्रजी टेलीव्हिजन माध्यमातील एका चॅट शोमध्ये जोनस ब्रदर्सची मुलाखत घेण्यात आली. या चॅट शोमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. निक जोनसचा भाऊ केविन जोनस यांने हा खुलासा केला आहे. केविन जोनसच्या छोट्या मुलीला म्हणजेच वॅलेंटिनाला (Valentina) सुरूवातीला प्रियांकासोबत कंम्फर्टेबल होण्यास थोडा वेळ लागल्याचं त्याने शेअर केलं आहे. केविनने शेअर केलं की, आता माझ्या मुलींना त्यांची काकी प्रियांका खूप आवडते. मात्र सुरूवातीला वॅलेंटिना प्रियांकाला निकला हातही लावू देत नसे. कारण वॅलेंटिनाला तिचा काका निक खूप आवडतो. त्यामुळे ती त्याच्याबाबतीत फारच प्रोटेक्टिव्ह आहे. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांमध्ये ती प्रियंकाचं निकसोबतचं वागणं सहन करू शकत नव्हती. जेव्हा जेव्हा प्रियंका निकच्या खांद्यावर हात ठेवत असे तेव्हा वॅलेंटिनाला खूप राग यायचा. प्रियांकासोबत असताना जर वॅलंटिना निकजवळ असेल तर ती चक्क प्रियांका हात झटकून द्यायची. मात्र हळूहळू वॅलेंटिनाच्या लक्षात आलं की प्रियांकादेखील आपल्या कुटुंबाचा हिस्सा आहे. त्यामुळे आता वॅलेंटिना प्रियंकाच्या खूप जवळची आणि लाडकी झाली आहे.त्यामुळे प्रियांका सध्या तिच्या जीवनात चांगलीच रमली आहे.

प्रियंका चोप्राचे आगामी चित्रपट


काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक यांचं 'सकर' हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या गाण्यात त्या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री दिसत होती. हे गाणं जोनस ब्रदर्सनी गायलं होतं.

शिवाय प्रियांकाचा  एक हॉलीवूड चित्रपटदेखील नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं नाव इस इंट इट रोमॅंटिक असं आहे. लवकरच ती 'दी स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर असेल. 'दी स्काय इज पिंक' चित्रपट सोनाली बोस दिग्दर्शित आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान आणि प्रियांका पुन्हा एकत्र काम करणार अशी चर्चा होती. मात्र 'भारत' चित्रपटात काम करण्यास प्रियांकाने ऐनवेळी नकार दिल्यामुळे यापुढे सलमान खान तिच्यासोबत पुन्हा काम करणार नसल्याची शक्यता आहे.


priyanka-chopra-nick-jonas-family-secret-revealed-1


जेव्हा सारा अली खानने केला अमिताभ बच्चन यांना ‘आदाब’ पहा हा क्युट व्हिडिओ


डिजीटल डिटॉक्सवरून परतलेल्या सईचं ‘लेडी बॉस’ फोटोशूट


#StrengthOfAWoman : प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये असल्याच पाहिजेत 'या' अॅप्स


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम