प्रियांका चोप्राच्या सासरच्यांचे टोमणे, लग्नसराई नीट झाली नाही

प्रियांका चोप्राच्या सासरच्यांचे टोमणे, लग्नसराई नीट झाली नाही

मागच्या काही दिवसांपासून बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा नवरा हॉलीवूड गायक निक जोनस (Nick Jonas) यांचा घटस्फोट होणार अशा अफवा येत होत्या. अर्थात ही बातमी खोटी होती. यामध्ये कोणतंही तथ्य नव्हतं. पण हल्लीच प्रियांकाच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या लग्नाबद्दल असं काही वक्तव्य केलं आहे की, पुन्हा एकदा याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर याच चर्चा रंगल्या आहेत.


 

वास्तविक प्रियांकाचा दीर आणि निकचा भाऊ जोनस लवकरच आपली गर्लफ्रेंड सोफी टर्नरबरोबर लग्न करत आहे. हल्लीच निक, जो आणि केविन जोनस एका शो मध्ये गेले होते. तेव्हा जो जोनसला त्याच्या लग्नाच्या तयारीबद्दल सर्वांनी प्रश्न विचारले, तेव्हा जो म्हणाला ‘मी माझ्या लग्नात एक गोष्ट नक्कीच घेऊन जात आहे. ती म्हणजे दारू. आम्ही फ्रान्समध्ये लग्न करत आहोत आणि तिथे खूप दारू असणं अत्यंत आवश्यक आहे. मी यामध्ये कोणतीही कमतरता ठेऊ इच्छित नाही.’
 

 

 


View this post on Instagram


 

 

I’m honestly speechless. Thank you Minneapolis.


A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

आपला भाऊ जो जोनसचं उत्तर ऐकून निकने सांगितलं की, जो यासाठी असं बोलत आहे कारण आपल्या लग्नात सगळी दारू संपली होती आणि त्यामुळे पाहुण्यांना त्रास झाला होता. निकने हेदेखील सांगितलं की, आपल्या लग्नाच्या तयारीवरून आम्ही हेच शिकलो आहोत. त्यामुळे जो जोनसच्या लग्नामध्ये कोणतीही कमतरता भासणार नाही आणि पाहुण्यांना त्रास होणार नाही.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Friends and rare days off on a Monday.


A post shared by Nick Jonas (@nickjonas) on
निक जोनस एक अमेरिकन गायक आणि गीतकार आहे. त्याने आपल्या 25 व्या वयातच लग्न केलं असून देसी गर्ल प्रियांका चोप्रापेक्षा निक 11 वर्षाने लहान आहे. दोघंही एका शो मध्ये पहिल्यांदा भेटले आणि एका कॉमन फ्रेंडकडून त्यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्या आणि एक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये जयपूरमध्ये दोघांनी लग्न केलं.


प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाचीही चर्चा


काही दिवसांपूर्वीच एका अमेरिकन मासिकाने प्रियांका आणि निक घटस्फोट घेत असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर अचानक सगळीकडे खळबळ माजली होती. त्याआधी प्रियांका गरोदर असल्याची बातमी होती. प्रियांका आणि निकचं लग्न झाल्यापासून रोज नव्या चर्चांना उधाण येत असतं. पण या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत दोघेही मजेत सध्या आयुष्य जगत असून नुकतंच एका ठिकाणी निक आणि त्याच्या पूर्ण कुटुंबीयांनी लाँच पार्टी केली होती. शिवाय नुकताच जोनस ब्रदर्सचा अल्बम प्रसिद्ध झाला असून यातील ‘सकर फॉर यू’ आणि ‘कूल’ ही दोन्हीही गाणी हिट झाली आहेत. जोनस ब्रदर्स सध्या विविध ठिकाणी त्यांचे गाण्याचे शो देखील करत आहेत. या प्रत्येक शो मध्ये प्रियांका हजर राहात असून ती आपलं आयुष्य एन्जॉय करत आहे.


mumbai reception nickyanka FB
प्रियांकाचं लग्न झाल्यापासून रोज काही ना काहीतरी बातम्या येत असतात. आता पुन्हा एकदा ही नवी बातमी चर्चेचा विषय झाली आहे. सध्या प्रियांका 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्येही व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसिमदेखील दिसणार आहेत. याशिवाय संजय लीला भन्सालीबरोबर प्रियांका लवकरच ‘गंगूबाई’ या चित्रपटातही काम करणार असल्याची चर्चा आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल


जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते


घटस्फोटाची बातमी दिल्याबद्दल प्रियांका आणि निक करणार मासिकाविरूद्ध कारवाई