ईशाच्या नव्या घरी प्रियांका आणि परिणितीने केली आईस्क्रिम पार्टी

ईशाच्या नव्या घरी प्रियांका आणि परिणितीने केली आईस्क्रिम पार्टी

बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) सध्या मुंबईमध्ये आहे. आल्या दिवसापासून प्रियांका पुन्हा एकदा रोज लाईमलाईटमध्ये आहे. सध्या आपली ही सुट्टी प्रियांका खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतेच प्रियांका आणि परिणितीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये दोघी आईस्क्रिम पार्टीची मजा घेत आहेत. इतकंच नाही तर ही पार्टी ठेवण्यात आली होती, ईशा अंबानीच्या वरळीतील नव्या घरी. या पार्टीमध्ये असणाऱ्या सर्व गर्ल्स गँगने खूप मजा केली असल्याचं या फोटोमधून दिसून येत आहे. इतकंच नाही तर या ग्रुपमध्ये आलिया भटलादेखील चिडवण्यात आलं आहे. या सर्व मैत्रिणी नेहमीच एकत्र असतात आणि पार्टी एन्जॉय करताना दिसतात. पण यावेळी या ग्रुपमधून आलिया मिसिंग होती.


ईशाने आपल्या नव्या घरी केली पार्टी होस्ट


ice cream party


वास्तविक ईशा अंबानी पिरामलने आपल्या नव्या घरी आईस्क्रिम पार्टी होस्ट केली होती. या पार्टीमध्ये तिची जवळची मैत्रीण प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा आणि अन्य काही मैत्रिणीही सहभागी झाल्या होत्या. या संपूर्ण गर्ल्स गँगने नाईट आऊटचे सर्व फोटोज आपल्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहेत.


आलियाला टॅग करत प्रियांकाने काढली तिची आठवण


ice cream


प्रियांका चोप्राने हा फोटो पोस्ट करत त्याखाली लिहिलेली कॅप्शन सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. प्रियांकाने या कॅप्शनमध्ये आलियाचीदेखील खूप आठवण काढली आहे. ‘होममेड आईस्क्रिम. होस्टेस अर्थात ईशा अंबानी तुझे मनपासून आभार. तुझं नवं घर खूपच सुंदर आहे. तू नेहमीच अशीच आनंदी राहा. मी नेहमीच यासाठी प्रार्थना करत राहीन.’ इतकंच नाही तर पुढे तिने आलियाला टॅग केलं आणि म्हटलं, ‘ही मजा मस्ती तू काही मिनिटांसाठी मिस केली आहेस. आम्ही तुझी आठवण काढली. सर्वांना मनापासून प्रेम.’ दरम्यान परिणितीने हा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले, ‘आतापर्यंतची सर्वात सुंदर रात्र’. ज्या रात्री ही मजामस्ती चालू होती, त्याच रात्री परिणितीनेदेखील हा फोटो शेअर केला होता. याआधी प्रियांकाच्या लग्नाच्यावेळी देखील अशीच पार्टी करण्यात आली होती. ज्यामध्ये आलिया भटदेखील होती. हा पूर्ण ग्रुप नेहमीच मजा मस्ती करताना दिसतो.


ईशा अंबानीचं नवं घर कायम चर्चेत


Anand-Piramal-Isha-Ambani-House


पार्टी करण्यात आलेलं हे घर अर्थातच ईशा अंबानीचं आहे. लग्नाच्या वेळी तिच्या सासू सासऱ्यांनी तिला हे घर गिफ्ट म्हणून दिलं होतं. त्यामुळे या घराची नेहमीच चर्चा होते. वरळी सी फेसवर असणारा हा बंगला आलिशान असून 450 कोटी रूपये इतकी साधारण या बंगल्याची किंमत आहे असं म्हटलं जातं.


प्रियांका सध्या मुंबईत


house


प्रियांका चोप्रा सध्या आपला भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी मुंबईत आली आहे. ती सध्या आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह वेळ घालवत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान प्रियांकाचा लग्नानंतर हॉलीवूडमध्ये 'Isn't It Romantic' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉलीवूड चित्रपट 'द स्काय इज पिंक' मध्ये फरहान खानबरोबर प्रियांका दिसणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साली यांच्या ‘गंगूबाई’ या चित्रपटातही प्रियांका चोप्रा दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल


जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते


प्रियांका चोप्रा प्रेग्नंट असल्याची बातमी खरी आहे का?, आईने सांगितलं सत्य