मागच्या वर्षी बाहुबली फेम एस. एस. राजमौलीने त्याच्या आगामी चित्रपट ट्रिपल आरबाबत एक मोठी घोषणा केली होती. राजमौली रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर या तेलुगू कलाकारांना घेऊन एक बिग बजेट चित्रपट करत आहेत. आतापर्यंत त्यांच्या बाहुबली आणि मगधीरासारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर मोहिनीच घातलेली आहे. त्यामुळे हा ट्रिपल आर कधी प्रदर्शित होणार याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात दोन बॉलीवूड कलाकार असणार अशीही चर्चा होती. या चित्रपटासाठी बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण आणि अभिनेत्री आलिया भटचीही निवड करण्यात आली होती. मात्र आता या चित्रपटातून आलियाचा पत्ता कट करण्यात आल्याचं वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या चित्रपटात प्रियांका चोप्रा झळकण्याची शक्यता आहे.
आलियाचा पत्ता का झाला कट
आलिया सध्या तिच्या सडक 2 च्या प्रमोशन आणि गंगुबाई काठियावाडीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाने या आधीच राजमौलीला ती त्यांचा सिनेमा सोडत असणार याची कल्पना दिली होती. आलियाची निवड या चित्रपटात रामचरण या अभिनेत्यासोबत करण्यात आली होती. मात्र आता आलिया हा चित्रपट सोडत असल्यामुळे राजमौलीला रामचरणसोबत एखाद्या चांगल्या अभिनेत्रीला कास्ट करायचे होते. त्यामुळे सध्या अशी चर्चा सुरू आहे की त्यांनी यासाठी प्रियांका चोप्राची निवड केलेली आहे. या आधीही प्रियांकाने रामचरणसोबत जंजीर या चित्रपटात एकत्र काम केलेलं होतं. या चित्रपटातील दुसरा हिरो ज्युनिअर एनटीआरसोबत काम करण्यासाठी ब्रिटिश अभिनेत्री ओलिविया मॉरिस तयार झालेली आहे. त्यामुळे आता फक्त या दोन अभिनेत्रींची अधिकृत घोषण राजमौली कधी करणार याची सर्वांना प्रतिक्षा आहे. अजय देवगणही या चित्रपटात असून त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री कास्ट असणार आहे हे ही चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायचं आहे.
आलियाने या चित्रपटासाठी केली होती तयारी
बाहुबलीसारखे भव्यदिव्य सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकासोबत काम करणं ही एखाद्या अभिनेत्रीसाठी एक खूप मोठी संधीच असू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियादेखील या चित्रपटात काम करण्यासाठी नक्कीच आतूर होती. आलियाने या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी देखील सुरू केली होती. ती यासाठी तेलुगू भाषेचे धडेही घेत होती. मात्र लॉकडाऊनमुळे या सर्व गोष्टींमध्ये मोठा खंड पडला. काहींच्या मते आलियाला या चित्रपटातून जाणिवपूर्वक बाहेर काढण्यात आलं आहे. तिची इंडस्ट्रीमध्ये असलेली प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर राजमौली यांनी आलियाची निवड तिच्या अभिनय आणि टॅलेंटमुळे केली होती. त्यामुळे ती कुणाची मुलगी आहे याचा या निवडीशी काहीही संबध नसायला हवा. त्यामुळे ते या निर्णयाशी कायम राहून आलियालाच त्यांनी या चित्रपटाची हिरॉईन करायला हवं. इतर चित्रपटांच्या शूटिंगमुळे खरंच आलियाकडे वेळ नाही की यामागची कारण काही वेगळीच आहेत हे वेळ आल्यावरच समजेल. शिवाय बॉलीवूड चाहत्यांसाठी आलिया काय अथवा प्रियांका काय दोघींपैकी कुणीही असलं तरी सारखंच.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
बाहुबली आता बनणार आदिपुरुष, केली ग्रँड घोषणा
अरे देवा आता कोकिलाबेन रॅपने घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ
जेव्हा या कलाकारांना भूमिका साकारण्यासाठी करावे लागले स्वतःमध्ये अफलातून बदल