प्रियंकाने बेबी प्लानिंगबाबत केला आहे ‘हा’ खुलासा

प्रियंकाने बेबी प्लानिंगबाबत केला आहे ‘हा’ खुलासा

प्रियंका चोप्रा जोनस सध्या तिच्या 'दी स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रियंका या चित्रपटाचं भारत आणि अमेरिकेत प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रियंकाने एक मोठा खुलासा  केला आहे. हा खुलासा तिच्या आणि निक जोनसच्या नात्याबाबत आहे. प्रियंकाला लग्नानंतर सतत तिच्या आई होण्याबाबत प्रश्न विचारले जातात. मात्र आता प्रियंकाने स्वतःच तिच्या बेबी प्लानिंगबाबत एक सर्वात मोठी गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Instagram

प्रियंकाला लवकर व्हायचं आहे ‘आई

प्रियंकाला 'दी स्काय इज पिंक'च्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत तिच्या बेबी प्लानिंगबाबत विचारण्यात आलं होतं. यावर प्रियंकाने चाहत्यांना असं उत्तर दिलं आहे, " मी आता आई होण्याची वाट नाही पाहू शकत. खरंतर मी आई होण्यासाठी फार आतूर झाली आहे. मला असं म्हणायचं आहे की, देवाच्या कृपेने अनेक जोडप्यांना आई-बाबा होण्याचा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे सहाजिकच आहे की मला आणि निकलादेखील आई-बाबा व्हायला नक्कीच आवडेल. प्रियंकाने स्वतः या गोष्टीचा खुलासा केल्यामुळे आता प्रियंका लवकरच गोड बातमी देणार अशी चर्चा सुरू आहे. 

Instagram

प्रियंकाच्या लग्नाबाबत आणखी एक खुलासा

प्रियंकाने तिच्या लग्नाबाबतदेखील एक खुलासा या मुलाखतीत केला आहे. प्रियंका लवकरत तिच्या लग्नसोहळ्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहे. प्रियंकाने तिच्या आगामी चित्रपटांबाबत सांगताना हा खुलासा केला आहे. दी स्काय इज पिंकनंतर प्रियंका काही हॉलीवूड प्रोजेक्टवर काम करणार आहे. शिवाय ती आनंद शीला यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटात काम करत आहे. दोन हॉलीवूड चित्रपटात ती स्वतः काम करणार आहे तर दोन चित्रपटांची ती निर्मिती करत आहे. यातील एक चित्रपट कॉमेडी चित्रपट असून तो तिच्या स्वतःच्या लग्नसोहळ्यावर आधारित असणार आहे.

प्रियंका निक बॉलीवूड-हॉलीवूडचं हॉट कपल

बॉडीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉडीवूडप्रमाणेच हॉलीवूडचंही हॉट कपल आहे.प्रियंका आणि निकचा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये विवाह झाला. प्रियंका आणि निकने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला होता.या दोघांच्या लग्नसोहळा सोशल मीडियावर प्रचंड गाजला होता. या दोघांच्या फोटो आणि मॅरीड लाईफची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरू असते. प्रियंका आणि निकचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे लग्नानंतर सतत त्यांच्याविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रियंका निकपेक्षा मोठी आहे तरी त्यांच्या वैवाहिक जीवनावर याचा कोणताच परिणाम झालेला नाही. प्रियंका आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल चाहते सतत काहीतरी चर्चा करतच असतात.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

नवीन रुपात येणार रंगीला… पोस्टरने आताच घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

भल्लालदेव राणा दग्गुबतीचे हे फोटो पाहून फॅन्सना बसला धक्का

आणखी एका रेट्रो गाण्यावर थिरकतेय नोरा फतेही, टीझर आऊट