अट मान्य असेल तरच लग्न करेन, प्रियांका चोप्राने केला निकसह लग्नाचा खुलासा

अट मान्य असेल तरच लग्न करेन, प्रियांका चोप्राने केला निकसह लग्नाचा खुलासा

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता हॉलीवूडमध्येही चांगलीच स्थिरावली आहे. लवकरच प्रियांकाचे पुस्तकही प्रकाशित होणार आहे. प्रियांका आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीच चर्चेत असते. सध्या निक जोनाससह प्रियांका आयुष्याचा आनंद घेत आहे. प्रियांका आणि निकचं लग्न खूपच गाजलं. निक प्रियांकापेक्षा 11 वर्षांनी लहान असल्यामुळे या लग्नाचा खूपच गवगवा झाला होता. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष उलटून गेली आहेत. मात्र प्रियांकाने निकला होकार देण्याआधी एक अट घातली होती याची तुम्हाला कल्पना आहे का? जागतिक जिजू असणाऱ्या निकने ही अट मान्य केली तेव्हाच प्रियांकाने लग्नाला होकार दिला असल्याचा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला आहे. ही अट सध्या निक पूर्ण करत आहे आणि त्यामुळेच दोघेही आपल्या आयुष्यात आनंदी आहेत असं प्रियांकाने सांगितले आहे. ही अट जर निकने मान्य केली नसती तर कदाचित लग्न झालं नसतं असंही प्रियांका म्हणाली.

व्हॅलेंटाईन डे साठी करा अभिनेत्रींसारखा ट्रेंडी मेकअप, खास टिप्स

काय होती प्रियांकाची अट

एलेन डीजेनर्सच्या ‘द एलेन शो’ मध्ये प्रियांकाने निकसह आपल्या लग्नाचा खुलासा केला आहे. निकशी लग्न करण्यापूर्वी आपण एक अट ठेवली होती असं तिने सांगितल्यावर नक्की कोणती अट ठेवली असंही प्रियांकाला विचारण्यात आले. त्यावर प्रियांका म्हणाली की, आम्ही दोघेही कामानिमित्त वेगवेगळ्या देशात व्यस्त असतो. सतत चित्रीकरणात व्यस्त असतो. पण परिस्थिती काहीही असो, कितीही शेड्युल व्यस्त असो, दोघेही दर महिन्यात काही दिवसांसाठी का असेना एकमेकांना नक्की भेटणार आणि हे मान्य असेल तरच लग्नाला होकार देईन असं प्रियांकाने निकला सांगितलं होतं. त्यामुळे कितीही काम असो आणि जगभरात कोणत्याही ठिकाणी असले तरीही प्रियांका आणि निक महिन्यात किमान दोन दिवस तरी एकत्र राहावं यासाठी नक्की प्रयत्न करतात. ही अट दोघांसाठीही महत्वपूर्ण असल्याचे प्रियांकाने पुढे सांगितले. अन्यथा लग्न झाले नसते. डेटिंग करत असताना दोन महिन्यात आम्ही साखरपुडा केला असल्याचेही तिने सांगितले. काही भेटींमध्येच मला निकने प्रपोझ केले आणि मला अजिबात याची आशा नव्हती. पण त्याने प्रपोझ केल्यानंतर मात्र मी स्वतःला सावरू शकले नाही आणि त्याला होकार दिला असंही प्रियांकाने स्पष्ट केले. डेटिंगपूर्वी निकला दोन वर्ष ओळखत असून आम्ही फारच कमी वेळा भेटलो होतो असंही प्रियांकाने मुलाखतीमध्ये सांगितले.

न ओळखता येण्यासारखा सैराटफेम अभिनेत्याचा वेबसिरीजसाठी नवा लुक

निकचा आत्मविश्वास अत्यंत चांगला - प्रियांका

प्रियांका चोप्राने या मुलाखतीमध्ये निकबद्दल भरभरून सांगितले. निकचा आत्मविश्वास सर्वात जास्त आवडत असल्याचेही तिने सांगितले. निकने एखादी गोष्ट हवी म्हटली की,  ती त्याला मिळतेच. कारण तो ती मिळविण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करतो. ही गोष्ट आपल्याला मिळेलच हा आत्मविश्वास त्याच्याकडे असतो.  प्रियांका आणि निकच्या जोडीकडे  नेहमीच आदर्श आणि प्रेरणात्मक जोडी म्हणून पाहिले जाते.  इतकंच नाही कितीही व्यस्त असले तरीही ही जोडी एकमेकांसाठी वेळ काढतेच आणि आपल्या चाहत्यांसाठीही सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करणे असो अथवा एकेमकांविषयी  प्रेम व्यक्त करणे असो  यामध्ये  कोणताही दुरावा येऊ देत नाही. एकमेकांविषयी किती प्रेम आहे हेदेखील सतत सोशल मीडियावर प्रियांका आणि निक शेअर करत असतात. त्यामुळेच या जोडीचे जगभरात अनेक चाहते आहेत आणि लवकरच प्रियांका आणि निकने गुड न्यूज ऐकवावी अशीही इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. 

चाहत्यांसाठी खुशखबर! या दिवशी प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी'

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक