प्रियांकाने गायले नीक जोनसचे गाणे, व्हिडिओ झाला व्हायरल

प्रियांकाने गायले नीक जोनसचे गाणे, व्हिडिओ झाला व्हायरल

प्रियांका चोप्रा आणि नीक जोनस यांच्या लग्नाला आता सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.पण त्यांच्यामधील रोमान्स हा अजूनही अगदी तसाच आहे. कामात व्यग्र असूनही एकमेकांना वेळ देण्यासाठी ते अगदी तत्पर असतात. आता त्यांचा आणखी एक #happymoment असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या फॅनपेजवर हा व्हिडिओ शेअर झाला असून अनेकांनी त्याला पसंती दिली आहे.

तापसी पन्नूला साकारायची आहे क्रिकेटरची भूमिका

नीक जोनासच्या गाण्यावर थिरकली प्रियांका

प्रियांकाच्या लग्नादरम्यान जोनस कुटुंबिय पुन्हा एकदा एकत्र आले. तीन भावांचा बँड पुन्हा एकदा एकत्र परफॉर्म करु लागला. काही महिन्यांपूर्वी Jonas brother ने त्यांचे sucker नावाचे गाणे आणले. हा हा म्हणता ते गाणं लोकांना आवडू लागलं ते इतकं आवडलं की, ते गाणं नंबर 1 वर पोहोचलं. आता या गाण्यात स्वत: काम केल्यानंतर या गाण्याची नशा काय ती प्रियांकाला नक्कीच माहीत असणार.. म्हणून गाणं रिलीज झाल्यानंतर इतक्या महिन्यांनी तिने हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे. Karokeवर हे गाणं प्रियांकाने गायले असून तिच्यासोबत या व्हिडिओमध्ये नीक जोनससुद्धा दिसत आहे. प्रियांकाने अनेक इंग्रजी गाणी गायली आहेत आणि ती प्रसिद्धही आहेत. पण नीकसोबत ती पहिल्यांदा  sucker या व्हिडिओमध्ये दिसली. ते ही वेगळ्या अवतारात 

#BBM2 च्या घरात पुन्हा वादाची ठिणगी

#Sucker ठरला नंबर1

Instagram

नीक जोनसचे sucker हे गाणे आल्यानंतर त्या गाण्याला प्रेक्षकांची भारीच पसंती मिळाली. या गाण्यामध्ये नीक जोनस, प्रियांका चोप्रा, जो जोनस, सोफी टर्नर, डॅनिअल जोनस असे संपूर्ण कुटुंब आहे.त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने मिळून हे गाणे केले आहे. त्यामुळेत हे गाणं हिट झाले, असे त्यांच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. जोनस कुटुंबातील नीक जोनस हा वेगळा होऊनही आपले अस्तित्व टिकवून होता. त्याची अनेक गाणी प्रसिद्ध होती. पण पुन्हा एकदा जोनस ब्रदरने एकत्र काम सुरु केल्यानंतर आता त्यांच्या करिअरचा ग्राफ परत वर चढू लागला आहे. त्यांचे एक प्रकारे कमबॅक झाले असे म्हणायला हवे.

रिमेक ' साकी साकी' गाण्यावर भडकली कोएना मित्रा, अजिबात आवडलं नाही गाणं

आयुष्य घालवायचे आहे आनंदात

Instagram

प्रियांका चोप्रा लग्न केल्यापासून तिचा एक एक क्षण चांगलाच एन्जॉय करत आहे. जोनस कुटुंबियांसोबत तिचा चांगला रॅपो जुळला असून अनेकदा हे कुटुंब बाहेर आऊटिंगला जाताना दिसते. कोणत्याही गोष्टीचा आनंद कसा घ्यावा हे प्रियांका आणि जोनस कुटुंबियांकडून शिकायला हवे. नुकतेच तिने तिचे व्हेकेशन इटलीमध्ये घालवले. त्यावेळचे तिचे अनेक फोटो सोशळ मीडियावर व्हायरल झाले होते.

सध्या दोघेही कामात व्यग्र

प्रियांका क्वाटिंकोमध्ये दिसल्यानंतर आता तिच्या फॅन्सना ती कोणत्या नव्या अवतारात दिसेल याची उत्सुकता आहे. प्रियांका ‘ स्काय इज पिंक’ या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदा फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. तर नीक जोनस सध्या त्याच्या अल्बममध्ये व्यग्र असून लवकरच तो वर्ल्ड टूर सुरु करणार आहे

नुकतीच आली होती भारतात

प्रियांका चोप्रा काहीच दिवसांपूर्वी भारत दौऱ्याला आली होती. या भारत दौऱ्याचे कारण स्काय इज पिंक हे होते. त्याच्या रॅप पार्टीसाठी ती इथे आली होती. त्यानंतर ती पुन्हा अमेरिकेत परतली.