प्रियांका चोप्रा तिच्या लुकमुळे पुन्हा एकदा झाली ट्रोल

प्रियांका चोप्रा  तिच्या लुकमुळे पुन्हा एकदा झाली ट्रोल

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. बऱ्याचदा प्रियांकाच्या तिच्या कपड्यांवरून ट्रोल होत असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मेट गाला इव्हेंटमधील प्रियांकाच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. नेटकऱ्यांनी त्या कपड्यांवरून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता प्रियांकाचा साडीमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रियांकाने बिना ब्लाऊजची साडी नेसलेली आहे.

प्रियांकाचा हॉट अंदाज


प्रियांकाने एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमधील प्रियांकाचा लुक ग्लॅमरस वाटत आहे. यासाठी तिने ग्लॅम लुकची गोल्डन साडी नेसली आहे. वास्तविक साडीतला लुक ब्लाऊजमुळे उठून दिसतो. मात्र या फोटोशूटसाठी प्रियांकाने बिना ब्लाऊजची साडी नेसली आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये तिला नाचताना साडी नीट सावरताही येत नाही आहे. बिनासाडीतील प्रियांकाचा लुक हॉट असला तरी चाहत्यांना मात्र तो मुळीच चांगला वाटला नाही आहे. शिवाय साडी हा पेहराव भारतीय संस्कृतीचं प्रतिक मानलं जातं. सहाजिकच प्रियांकाच्या या बिना ब्लाऊजच्या साडीमधल्या या लुकमुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. एवढंच नाही तर यासाठी चाहत्यांनी प्रियांकाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.


priyanka chopra 2


चाहत्यांकडून मिळत आहेत अशा प्रतिक्रिया...


प्रियांकाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. यावर काहींनी प्रतिक्रिया दिली आहे की, “प्रियांका हॉलीवूडमध्ये गेल्यापासून आपली भारतीय संस्कृती विसरली आहे.” तर काहींनी तिला “तू सुंदर असलीस तरी साडी शरीर झाकण्यासाठी असते असं सुनावलं आहे.” एका चाहत्यांने तर “गरीबांनी कपडे नाही घातले तर ते बेशरम ठरतात आणि श्रीमंतांनी कपडे नाही घातले तर ती फॅशन ठरते” असा प्रश्नच विचारला आहे. असं असलं तरी काही चाहत्यांना मात्र हा प्रियांकाचा लुक फार आवडला आहे. कारण त्यांनी या व्हिडीओवर प्रियांकाचा हा बोल्ड आणि ब्युटीफुल लुक त्यांना आवडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


priyanka chopra 3


प्रियांका चोप्राचे आगामी चित्रपट


काही दिवसांपूर्वीच प्रियांका आणि निक यांचं ‘सकर’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या गाण्यात त्या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री दिसली होती. हे गाणं जोनस ब्रदर्सनी गायलं होतं. शिवाय प्रियांकाचा एक हॉलीवूड चित्रपटदेखील नेटफ्लिक्सवरदेखील रिलीज झाला होता. या चित्रपटाचं नाव ‘इस इंट इट रोमॅंटिक’ असं होतं. लवकरच ती ‘दी स्काय इज पिंक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर असेल. दी स्काय इज पिंक चित्रपट सोनाली बोस दिग्दर्शित आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे.


priyanka chopra 1 %281%29


साऊथ स्टार धनुष करणार 'अंधाधुन' चित्रपटाचा रिमेक


दिया मिर्झाचं 'काफिर'मधून वेबसिरिजमध्ये पदार्पण


दिशा पाटनीच्या हाॅट फोटोंमुळे वडिलांची काय असते प्रतिक्रिया, दिशाने केला खुलासा


फोटोसौैजन्य - इन्स्टाग्राम