मिस वर्ल्डपासून ते हॉलीवूडपर्यंतचा प्रियांका चोप्राचा बदललेला लुक आहे कसा

मिस वर्ल्डपासून ते हॉलीवूडपर्यंतचा प्रियांका चोप्राचा बदललेला लुक आहे कसा

प्रियांका चोप्रा ही मनोरंजन जगतातील आता एक खूपच मोठी व्यक्ती मानली जाते. केवळ भारतातच नाही तर विदेशातही प्रियांकाचे लाखो चाहते आहेत. अभिनय असो वा फॅशन सेन्स प्रियांका कधीही आपल्या चाहत्यांची निराशा करत नाही. 2000 या वर्षामध्ये प्रियांकाने मिस वर्ल्डचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला. त्यानंतर तिच्या प्रवासाला जी सुरुवात झाली त्यानंतर प्रियांकाने कधीही मागे वळून पाहिलेलं नाही. पण या सगळ्या प्रवासामध्ये प्रियांकाचा लुक मात्र खूपच बदलला. आपण याच लुकविषयी थोडं जाणून घेणार आहोत. प्रियांकाचे चाहतेही आहेत आणि ती आवडत नाहीत असेही बरेच लोक आहेत. पण प्रियांकाने आतापर्यंत आपल्याला जे हवं तेच केलं आहे आणि अगदी ट्रोलर्सचीही तोंडं बंद केली आहेत.


priyanka
इतक्या वर्षात केवळ प्रियांकाच्या अभिनयातच बदल नाही झाला तर तिचा संपूर्ण लुक आणि फॅशन सेन्सही खूप बदलला. खरं तर हा बदल कसा झाला याबाबत प्रियांकाच सांगू शकते. पण आम्ही तुम्हाला तिच्यामधील हा बदल या लेखाद्वारे दाखवत आहोत. प्रियांकाला बघितल्यानंतर आपल्यालाही प्रश्न पडतो की, माणसामध्ये इतका फरक नक्की कसा काय पडू शकतो.


मिस वर्ल्डचा मुकुट मिळाला तेव्हा...


Priyanka collage FI


वर्ष 2000 मध्ये प्रियांका चोप्राला मिस वर्ल्ड हा पुरस्कार प्राप्त झाला. त्याचवर्षी लारा दत्तादेखील मिस युनिव्हर्स हा पुरस्कार मिळाला. दोघींनीही आपलं करिअर 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटापासून सुरू केलं. या चित्रपटामध्ये प्रियांका खूपच वेगळी दिसत होती. ती या चित्रपटात खूपच डस्की दिसत होती. त्यावेळी तिच्या रंगावरूनदेखील बरीच चर्चा झाली होती.


त्यानंतर दिसली सेन्शुअस भूमिकेत


Aitraaz


प्रियांकाने त्यावेळी अक्षयकुमारबरोबर बरेच चित्रपट केले. तिचा पहिला हिट चित्रपट होता ‘मुझसे शादी करोगी’. या चित्रपटात तिच्या लुक्स आणि अभिनयाची प्रशंसा झाली होती. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘ऐतराज’ या चित्रपटामुळे. या चित्रपटामध्ये प्रियांकाने साकारलेली खलनायिकेची भूमिका खूपच चर्चेत आली होती. त्यासाठी तिला बरेच पुरस्कारही मिळाले. या चित्रपटात प्रियांकाचा बराच हॉट आणि बोल्ड अवतार दाखवण्यात आला होता. त्यानंतर तिचे अजून लुक्स बदलत गेले.


फॅशनने बदललं प्रियांकाचं आयुष्य


Fashion


प्रियांकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘फॅशन’ या चित्रपटाने. प्रियांकाचं करिअर आणि संपूर्ण आयुष्यच या चित्रपटामुळे बदललं. या चित्रपटामध्ये प्रियांकाचा अभिनयच नाही तर लुक्सचीदेखील बरीच चर्चा झाली. या चित्रपटासाठी प्रियांकाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. असं म्हटलं जातं की, या चित्रपटासाठी प्रियांकाने आपलं नाक आणि ओठांची सर्जरी करून घेतली होती. त्यामुळे या चित्रपटातील तिचा लुक पूर्ण बदलला होता.


रेड कारपेटची शान बनली प्रियांका


Street   red Carpet look collage


केवळ चित्रपटातच नाही तर तिच्या रिअल लाईफमध्येही प्रियांकाने आपला लुक खूप बदलला. स्ट्रीट लुक असो वा रेड कारपेट असो प्रियांकाने कधीही आपल्या चाहत्यांची निराशा केली नाही. प्रियांका रेड कारपेटची तर शान बनली.


ड्रेसिंग सेन्सवरून बऱ्याचदा झाली ट्रोल


Troll look collage


आपल्या ड्रेसिंग सेन्सवरून प्रियांका खूप वेळा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. 15 ऑगस्टला घातलेला ट्रायो रंगाचा दुपट्टा असो वा पंतप्रधान मोदींना भेटायला गेल्यानंतर घातलेला शॉर्ट ड्रेस असो, प्रत्येक वेळी प्रियांकाला ट्रोल करण्यात आलं. पण प्रियांकाने या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत हे प्रत्येकवेळी दाखवून दिलं.


क्वांटिको आणि बेवॉच मधून केली सगळ्यांची बोलती बंद


Bewatch collage


लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करत प्रियांका चोप्राने अमेरिकन टीव्ही सिरीज क्वांटिको आणि चित्रपट बेवॉचद्वारे पूर्ण जगाचं तोंड बंद केलं आणि आपलं टॅलेंट केवळ भारतापुरतं नाही तर जगभरात दाखवून दिलं. त्यामुळे आता केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रियांकाच्या लुक्स आणि ड्रेसिंग सेन्सचे लाखो चाहते असून तिला बरेच लोक फॉलोही करतात.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा


प्रियांका चोप्राच्या सासरच्यांचे टोमणे, लग्नसराई नीट झाली नाही


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल


जेव्हा प्रियांका चोप्रा निक जोनसला एक्स गर्लफ्रेंडबरोबर चॅट केल्यावर पकडते