प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं

प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं

प्रियांका चोप्रा आणि तिचं कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमीच चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय ते प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचं लग्न मोडल्यामुळे. सिद्धार्थचं लग्न मोडल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीदेखील सिद्धार्थचं लग्न 2014 मध्ये कनिका माथूरबरोबर ठरलं होतं आणि काही कारणाने ते मोडलं होतं. पण आता ही दुसरी वेळ आहे. सिद्धार्थ आणि इशिता कुमारचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झाला होता आणि एप्रिलमध्ये या दोघांचं लग्न होणार होतं. पण हे लग्न मोडल्याची माहिती सिद्धार्थ आणि प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी प्रसारमाध्यमांना दिली.


siddharth ishita


प्रियांका होती मुंबईत


priyanka chopra parineeti made ice cream at isha ambani house FI


काही दिवसांपूर्वीच प्रियांका मुंबईत आली तेव्हा ती सिद्धार्थ आणि इशिताच्या लग्नासाठी आली होती असं सांगण्यात येत होतं. पण त्याच दरम्यान इशिताने आपल्या सर्जरीचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण मधु चोप्रा यांनी दोन्ही कुटुंबांनी आणि सिद्धार्थ आणि इशिताने एकमेकांशी बोलून लग्न न करण्याचा निर्णय घेत असल्याचं सांगितलं आहे. पण यामागचं नेमकं कारण काय आहे हे सांगण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. लग्न न करण्याचा निर्णय हा दोघांचाही असल्याचं सांगण्यात आलं आहे.


इशिताच्या सर्जरीनंतर बिनसलं सर्व काही
 

 

 


View this post on Instagram


 

 

Cheers to new beginnings🥂 With a goodbye kiss to beautiful endings 🌺


A post shared by Ishita Kumar (@ishittaakumar) on
काही दिवसांपूर्वीच इशिताला काही अपरिहार्य कारणाने एका सर्जरीला सामोरं जावं लागलं होतं. पण या सर्जरीच्या वेळीच हे लग्न होणार की नाही अशा शंका मीडियामध्ये पसरू लागल्या होत्या. पण त्यावेळी कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्यामुळे या केवळ चर्चाच राहिल्या होत्या. पण आता खुद्द सिद्धार्थच्या आईने ही माहिती दिल्याने ही गोष्ट खरी असल्याचं समोर आलं आहे. शिवाय इशिता कुमारने आपल्या साखरपुड्याचे आणि सिद्धार्थबरोबर असलेले सर्व फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट केले आहेत. दरम्यान तिने सर्जरीनंतर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये पुन्हा एकदा नवी सुरुवात करत असल्याचंही म्हटलं आहे. त्यावर तिच्या आईने ‘जुनी पुस्तकं बंद करून नवीन कथा लिहायला सुरुवात कर’ असंही म्हटलं आहे.


नक्की लग्न का मोडलं?


सिद्धार्थचं लग्न मोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. पहिल्या वेळी कनिका माथूरबरोबर गोव्यामध्ये सिद्धार्थचं लग्न होणार होतं. पण त्यावेळीदेखील नक्की असं काय घडलं आणि लग्न मोडलं हे कोणालाही समजू शकलेलं नाही. तर आताही इशिताबरोबर नक्की असं काय घडलं हे समजू शकलेलं नाही. दरम्यान प्रियांका मुंबईत असताना तिने आपले बरेच फोटो शेअर केले होते. त्या दरम्यान तिने अगदी आपल्या मैत्रिणींबरोबर नाईट आऊट्सही केले. त्यामुळे नक्की काय झालं आहे हे केवळ चोप्रा आणि कुमार कुटुंबीयांनाच माहीत. त्यामुळे सिद्धार्थच्या लग्नाबाबत सध्या सगळीकडेच कुजबूज सुरु आहे हे नक्की. तर दुसऱ्या बाजूला प्रियांकाच्या सासरी तिचा दीर जो जोनास आणि सोफी टर्नरचं नुकतंच लग्न पार पडलं असून या लग्नालाही प्रियांका होती. इतकंच नाही तर ती सोफीची ब्राईड्स मेड होती. त्यामुळे एकीकडे भावाचं लग्न मोडल्याचं दुःख तर दुसरीकडे दीराचं लग्न होण्याचा आनंद अशा द्विधा मनस्थितीत सध्या प्रियांका असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा -


प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न 'या' कारणामुळे लांबणीवर


देसी गर्ल प्रियांका दिसू शकते ‘मार्व्हल’स भूमिकेत


प्रियांका चोप्रा आणि निक जोनसचे वेकेशन फोटो व्हायरल