खुशखबर! खुशखबर PUBG खेळणाऱ्यांसाठी खुशखबर… हो तुम्ही ऐकताय ते एकदम खरं आहे. गेल्यावर्षी चीनमधील सगळ्या अॅपवर बंदी घातल्यानंतर सगळ्यात लोकप्रिय असा व्हिडिओ गेम म्हणजे PUBG बंद झाला होता. त्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. पण आता पुन्हा एकदा हा गेम एका नव्या रुपात सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. काहीच दिवसांपूर्वी हा खेळ पुन्हा एकदा सुरु होणार असल्याचा एक व्हिडिओही प्रदर्शित झाला होता. पण तो काही काळासाठी डिलीट करण्यात आला. पण आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार आता एका नव्या नावाने हा गेम भारतात येणार आहे. चला तर जाणून घेऊया या विषयी अधिक
PUBG मधून झाली अनेकांची सुटका, ट्विटरवर मीम्सचा पाऊस
आधीच दिली होती माहिती
PUBG हा गेम पुन्हा एकदा सुरु होणार याची माहिती या आधीच देण्याच आली होती. जेमवायर या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार खास भारतीयांसाठी या खेळाची निर्मिती करण्यात आली आहे. बॅटलग्राऊंड ऑफ इंडियार आधारीत असलेला हा खेळ भारतावर आधारीत असणार आहे अशी माहिती मिळत आहे. 7 एप्रिल रोजी ही माहिती लीक झाली. PUBG या खेळाची एक वेबसाईट देखील तयार करण्यात आली आहे. पण हा खेळ भारतात केव्हा लाँच करणार या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण लवकरच हा खेळ भारतीयांसाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हा खेळ ज्यांनी खूप मिस केला त्यांना पुन्हा एकदा हा खेळ खेळण्यात येणार आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्टवर पोस्ट
सगळ्या सोशल मीडियावर सध्या या खेळाची चर्चा होताना दिसत आहे. अनेक फॅनपेजेसनी आतापासूनच हा खेळ कसा असणार आहे याचा एक अंदाज तयार केला आहे. त्यासाठी बॅटल ग्राऊंडम्हणून तर काहींनी संपूर्ण देशाचा नकाशाच टाकला आहे. या खेळासाठी कोणते बॅटलग्राऊंड असणार याचा कोणताही अंदाज देण्याआधीच सगळ्यांनी या बॅटल फिल्डची अधिक माहिती दिलेली दिसत आहे. त्यामुळे एकूणच लोकांमध्ये या खेळाविषयी अधिक उत्सुकता वाढताना दिसत आहे. PUBG असा सर्च केला तरी देखील तुम्हाला यामध्ये खूप साऱ्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता फक्त हा खेळ रिलीज होण्याची सगळेच वाट पाहात आहेत.
‘रसोडे मै कौन था’ मीम्स सरकारलाही भावले, असा केला वापर
सगळ्यात जास्त खेळला गेलेला खेळ
गेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना एका खेळाने वेड लावले तो गेम म्हणजे PUBG . या खेळामुळे संपूर्ण तरुणवर्गामध्ये या खेळाची चर्चा होती. नाकानाक्यावर मुले एकमेकांशी बोलयाचे सोडून हा खेळ खेळत बसलेली असायची. ज्यावेळी चीनशी संबंध बिघडले त्यावेळी अनेक देशांनी या खेळावर बंदी आणली. हा खेळ आता या पुढे या देशात खेळण्यास मज्जाव करण्यात आला. इतकेच नाही तर या सोबत काही अजून चीनी अॅप देखील बंद करण्यात आले. पण आता या एक अॅपमधील PUBG हा खेळ पुन्हा सुरु करण्यासाठीचे हे नवे प्रयत्न दिसून येत आहे. अनेक देशांमध्ये हा खेळ सुरु आहे. तर का खेळाचे राईट्स इतरांना देऊनही हा खेळ सुरु ठेवण्यात आला आहे. आता हा खेळ भारतात सुरु करण्यासाठी कोणत्या देशांनी प्रयत्न केला आहे आणि हा खेळ कसा सुरु करण्यात येणार आहे या विषयीची अधिक माहिती लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.
आता ज्यांनी या खेळाला मिस केलं त्यांना अगदी थोडेच दिवस या खेळाची वाच पाहायची आहे.
लवकरच भेटीला येणार ‘पवित्र रिश्ता 2’, मानवचा शोध सुरु