ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Good News: अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, लॉकडाऊनमध्येच केलं लग्न

Good News: अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, लॉकडाऊनमध्येच केलं लग्न

यावर्षी बऱ्याच वाईट बातम्या येत असल्या तरी काही सेलिब्रिटींच्या आयुष्यात मात्र चांगल्या गोष्टीही घडत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटींची लग्नही झाली. नुकतीच करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी आपल्या घरात नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी शेअर केली. तर आता अशीच एक अजून गोड बातमी आहे ती म्हणजे सेलिब्रिटी कपल पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांच्याकडे. या जोडीने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले असून आता पूजा गरोदर असल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा आणि कुणाल यावर्षी धुमधडाक्यात एप्रिलमध्ये लग्न करणार होते. मात्र कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे दोघानीही लग्नासाठी जमवलेले पैसे कोरोना योद्ध्यांना दान केले आणि कोर्टात लग्न केले. आता या जोडीकडे अजून एक खुषखबर असून पूजा आणि कुणालकडे लवकरच एक लहान पाहुणा येणार आहे. पूजाने स्वतः तिचे फोटो शेअर करत ही गोड बातमी शेअर केली आहे. 

लॉकडाऊनमध्ये केले या सेलिब्रिटींनी ‘शुभमंगल’

लॉकडाऊनमुळे केले साध्या पद्धतीने लग्न

पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. गेल्या वर्षीच या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता. एप्रिल महिन्यात दोघेही लग्नाचा मोठा सोहळा करणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे दोघांनाही अगदी साध्या पद्धतीने कोर्टात लग्न करावे लागले. मात्र लग्नासाठी ठेवलेले पैसे या दोघांनीही मोठ्या मनाने कोविड योद्ध्यांसाठी दान केले. मार्चमध्ये कोर्टात लग्न केल्यानंतर आता पूजाने काही फोटो शेअर करत आपल्या मित्रमैत्रिणींचे आभार मानले आहेत. या गरोदरपणात तिचे लाड पुरविल्याबद्दल त्यांचे आभार मानले असून तिला अशा लाड करून घेण्याची सध्या गरज आहे असंही तिने म्हटलं आहे. कुणार वर्माबरोबर आपले काही फोटो शेअर करत तिने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

अखेर बॉलीवूडच्या या सेलिब्रिटी जोडीने घेतला घटस्फोट, मुलाला दोघंही सांभाळणार

ADVERTISEMENT

मा वैष्णवदेवी शो सोडला

पूजा बॅनर्जी लॉकडाऊन आधी मा वैष्णवदेवी या मालिकेत काम करत होती. मात्र आता तिने हा शो सोडला असून ती सध्या आपल्या गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत आहे. बाळाला आणि स्वतःला जपण्यासाठी लागणारी सर्व काळजी पूजा आणि तिचा नवरा कुणाल घेत आहेत असंही तिने सांगितलं आहे. पूजाने एप्रिलमध्ये एक फोटो शेअर करत आज आपले लग्न होणार होते पण काही कारणामुळे अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबद्ध झाल्याचे सांगितले होते. पूजा आणि कुणाल हे एकमेकांचे अनेक वर्ष मित्र असून दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात आणि कुणालचं आपल्यावर खूप प्रेम असल्याचं एका मुलाखतीमध्ये पूजाने सांगितलं होतं. ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि गेले 12 वर्ष ते एकमेकांना ओळखत असल्याचंही तिने सांगितलं होतं. गेल्या वर्षी 16 ऑगस्टला दोघांचा साखरपुडा झाला आणि यावर्षी दोघांनी आपण आईवडील होत असल्याची गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. तसंच आमच्याबरोबर तुमच्या सदिच्छा कायम राहू द्या असंही पूजाने आपल्या काही फोटो शेअर करताना म्हटले आहे. आता पूजाची तब्बेत चांगली राहो आणि तिची डिलिव्हरी व्यवस्थित होऊ दे हीच तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. तसंच तिच्या मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियावर तिचे आणि कुणालचे अभिनंदन केले आहे.

सडक2 च्या ट्रेलरला प्रेक्षकांची नापसंती, लाईक्सपेक्षा जास्त डिस्लाईक्स

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

16 Aug 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT