ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी पुष्करचा खास ‘झिल-मिल’ व्हिडिओ

ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी पुष्करचा खास ‘झिल-मिल’ व्हिडिओ

ख्रिसमस अवघ्या एका दिवसावर आला आहे आणि सगळीकडे अगदी आनंदाचं आणि सेलिब्रेशनचं वातावरण दिसून येत आहे. सगळीकडेच आता ख्रिसमस आणि न्यू ईअर सेलिब्रेशनच्या तयारीला आता सुरुवात झालेली दिसून येत आहे. सेलिब्रेशन तितक्याच हटके आणि डान्सिंग स्टाईलने करण्यासाठी डान्सिंग साँग ‘झिल मिल’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘बेखबर कशी तू’ या रोमँटिक गाण्याने अनेकांना प्रेमात पाडल्यानंतर सेलिब्रेशन स्पेशल ‘झिल मिल’ हे खास गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून यामध्ये पुष्कर जोगचा रॉकिंग अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


 DR14031 1
पुष्कर जोगची चाहत्यांना ट्रीट


पुष्कर जोगने याआधीही बऱ्याच मराठी चित्रपटांमधून काम केलं आहे. पुष्करने नेहमीच आपण एक चांगला डान्सर असल्याचं सिद्ध केलं आहे. आता पुन्हा एकदा व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ‘झिल मिल’ या डान्सिंग नंबरवर पुष्कर जोगचा रॉकिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. पुष्करला डान्सची किती क्रेझ आहे आणि मनापासून आवड आहे हे आपण अनेकदा शो, चित्रपटांतून पाहिलंय. त्यामुळे पुष्करची ‘झिल मिल’ ही त्याच्या चाहत्यांसाठी स्पेशल ट्रीट ठरणार आहे. हे गाणं गायलं आहे ते सलीम मर्चंट यांनी. खास ख्रिसमससाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला असून ख्रिसमसच्या पार्टीला या गाण्याने नक्कीच धमाल येईल.

Subscribe to POPxoTV

‘झिल मिल’ हे गाणं गायक सलीम मर्चंट यांनी त्यांच्या रॉकिंग आवाजात गायलं आहे. बॉलिवूडमध्ये सलिम मर्चंट यांनी प्रेक्षकांना सुपरहिट गाणी दिली आहेत, त्यामुळे त्यांच्या आवाजातील ‘झिल मिल’ हे गाणं मराठी प्रेक्षकांसाठी एक खास न्यू ईअर भेट ठरणार आहे. अभिनेत्री आणि गीतकार अदिती द्रविडने हे गाणं लिहिलं असून साई-पियुष या जोडीने या गाण्याला म्युझिक दिले आहे. तर हे गाणं ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि सिडनीच्या नयनरम्य ठिकाणी शूट करण्यात आलं आहे. त्यामुळे या ख्रिसमसला पुष्कर जोगने एक वेगळी भेट मराठी प्रेक्षकांना दिल आहे असंच म्हणावं लागेल.