सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी सेलिब्रिटींना Throwback चा आधार

सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी सेलिब्रिटींना Throwback चा आधार

‘अंदर से कोई बाहर ना जा सके.. बाहर से कोई अंदर ना आ सके’ अशी तुमची आमची आणि सगळ्या सेलिब्रिटींची अवस्था सध्या झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो तरी टाकायचे कुठले असा त्यांनाही प्रश्न पडला आहे. पुढचे काही दिवस आता कोणालाच कुठेही प्रवास करता येणार नाही. काही काम करता येणार नाही( म्हणजे घरातील कामं सोडून बरं का) त्यामुळे आता अनेक सेलिब्रिटींनी #throwback चा आधार घ्यावा लागत आहे.  लॉकडाऊन आधी गेलेल्या काही छान प्रवासाच्या पार्टीच्या आठवणी सोशल मीडियावर सेलिब्रिटी पोस्ट करत आहे. आता तुम्हाला #boredom ने ग्रासलं असेल तर तुम्ही ही याच हॅशटॅगला फॉलो करा आणि सध्या दिवस घालवा. पण त्याआधी पाहुया सेलिब्रिटींचे हे #throwback फोटोज 

खिलाडी अक्षय कुमार ट्विंकलला घेऊन पोहोचला रुग्णालयात

उर्वशी रौतेला

हॉट सिझलिंग उर्ली रौतेला तिच्या अंदाजाने नेहमीच सगळ्यांना घायाळ करते. तिचे सोशल मीडियावरील फोटोच जाची साक्ष आहे. उर्वशी रौतेला लॉकडाऊनमुळे तिच्या मागच्या काही दिवसांना फारच मिस करतेय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सगळ्यात जास्त जुन्या फोटोंचा हा  #throwback बघायला मिळत आहे. बीच आणि बिकीनीची विशेष आवड असलेल्या उर्वशीने तिचे असेच काही जुने फोटो शेअर केले आहे. 

काजोलने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

काजोलनेही तिच्या सोशल मीडियावरुन #throwback फोटो शेअर केला आहे. तिने जुन्या आठवणींना उजाळा देत एक जुना फोटो शेअर केला आहे. एवढेच नाही तर तिने तिचे आणखी काही जुने फोटो देखील शेअर केले आहे. तिने फोटो शेअर करत मी रोज माझ्या स्टोरीजमध्ये माझ्या आयुष्यातील काही चांगल्या आठवणी शेअर करेन असे देखील म्हटले आहे. 

एकेकाळी प्रिन्स चार्ल्ससोबत रंगला होता या अभिनेत्रीचा किसचा किस्सा

विकी कौशल रमला बालपणात

View this post on Instagram

Good quarantine boys. Wassup brother! @sunsunnykhez

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

Hows the josh? म्हणत विकी कौशल मात्र त्याच्या बालपणात रमला आहे. त्याने त्याचा एक बालपणातील फोटो शेअर केला आहे. त्याचा भाऊ सनी कौशलसोबतचा त्याचा हा फोटो खूप जणांना आवडला आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंटसदेखील केल्या आहेत. सध्या विकी कौशल त्याचा #Quarantine वेळ आपल्या भावासोबत घालवताना दिसत आहे. 

करिश्मा कपूरचा जुना अंदाज

बॉलीवूडची लोलो ही जुन्या आठवणींमध्ये रमली आहे. ती अनेकदा तिच्या जुन्या चित्रपटांचे काही खास क्षण शेअर करत असते. पण आताच्या दिवसात या सगळ्या फ्लॅशबॅक मेमरीज जास्त चांगल्या वाटत आहेत .करिश्मा कपूरनेही असेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेले आहेत. 


आता फिरायला मिळत नाही म्हणून तुमचे आवडते सेलिब्रिटीही कदाचित घरी राहून बोअर झाले असतील पण ते सगळ्यांच्या सुरक्षेसाठी घराबाहेर जात नाहीत. त्यामुळे तुम्हीही जाऊ नका. तुमच्याकडे असलेले तुमचे फोटो शेअर करा. शेअर करायचे नसतील तर तुमचा हा अल्बम तुम्हीच एकदा बघा. आता आणि तेव्हा तुमच्यामध्ये झालेले बदल टिपा. तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

फोटो सौजन्य: Instagram