ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
कला आणि चित्रपटातील योगदानासाठी आर माधवनला मिळाला सन्मान

कला आणि चित्रपटातील योगदानासाठी आर माधवनला मिळाला सन्मान

रंगनाथन माधवन म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडका ‘आर माधवन’ला नुकताच एक सन्मान मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रात गेली दोन दशकं आपल्या सक्षम अभिनयाने आर माधवनने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता वयाच्या पन्नाशीत असताना आर माधवनला कला आणि चित्रपट क्षेत्रातील त्याच्या योगदानाबद्दल डी लिट पदवी मिळाली आहे. ही पदवी त्याला डी वाय पाटील शिक्षण संस्था कोल्हापूरच्या वतीने देण्यात आली आहे. आर माधवनने स्वतःच्या आयुष्यातील या आनंदी क्षणाचे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच त्याने हेही शेअर केलं आहे की, “डी वाय पाटील शिक्षण संस्था, कोल्हापूर ने डी लिट पदवीने सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचा आभारी  आणि कृतज्ञ आहे. हा माझ्यासाठी एक सन्मान आणि जबाबदारीसुद्धा आहे” त्याच्या या पोस्टवर इतर बॉलीवूड आणि टॉलीवूड सेलिब्रेटीज आणि चाहत्यांच्या लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊस पडत आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पदवी प्रदान झाल्यावर आर माधवन भावूक होत म्हणाला होता की, “मी या सन्मानासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. हा सन्मान मला भविष्यात येणाऱ्या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल” 

आर माधवनला जायचं होतं आर्मीमध्ये

आर माधवने इलेक्ट्रॉनिक्समधून बीएस्सी केलेलं आहे. शालेय जीवनापासूनच तो अतिशय हुशार आणि बुद्धीमान होता. 1988 साली त्याला त्याच्या शाळेतून कॅनडामध्ये कल्चरल एम्बेसेडर म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. तो ब्रिटिश आर्मी म्हणजेच रॉयल नेव्ही आणि रॉयल एअर फोर्सची ट्रेनिंग घेणारा एक  यशस्वी एनसीसी कॅंडिडेटपण होता. त्यामुळे त्याला तरूणपणी खरंतर आर्मी फोर्समध्ये करिअर करण्यात जास्त रस होता मात्र या क्षेत्रात जाण्यासाठी त्याला वयाचे सहा महिने कमी पडले आणि ती संधी त्याच्याकडून हुकली गेली. ज्यामुळे पुढे तो चित्रपट सृष्टीत आला आणि बॉलीवूडला आर माधवनसारखा एक दिग्गज कलाकार मिळाला. त्याने नव्वदच्या दशकात ‘बनेगी अपनी बात’ या टेलिव्हिजन मालिकेतून अभिनय करिअरला सुरूवात केली होती. पण त्याला  सर्वात पहिलं यश मिळालं ते मणिरत्नम यांच्या ‘अलाईपयूथे’ या तमिळ चित्रपटातून. हा 2000 सालचा एक रोमॅंटिक चित्रपट होता. पुढे अनेक तमिळ चित्रपटात काम केल्यावर त्याने त्याचं नशीब हिंदी चित्रपटातून आजमावलं. 

आर माधवनचा मॅडी सर्वात जास्त गाजला

आर माधवनला रहेना है तेरे दिल में या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये खास ओळख मिळाली. आजही त्याला त्याचे चाहते RHTDM चा मॅडी या  नावाने ओळखतात. या चित्रपटाची गाणीदेखील सुपरहिट झाली होती. त्यानंतर थ्री इडिअट्स, तन्नू वेड्स मन्नूचे सिक्वल अशा अनेक चित्रपटातून तो बॉलीवूडचा सुपरस्टार झाला. सध्या त्याने वेबसिरिजमध्येही स्वतःचा चांगला जम बसवला आहे. त्याच्या ब्रीद या वेबसिरिजला चांगला प्रतिसाद मिळाला. काहीच दिवसांत तो इस्रोच्या माजी वैज्ञानिक नंबी नारायण यांची बायोपिक ‘रॉकेट्री दी नांबी इफेक्ट’मधून प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाची झलक दाखवणार आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडा Shivaji Maharaj Marathi Songs & Powada

‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण

सुयश टिळकला नेमकं झालंय तरी काय…पोस्टमुळे चाहते बुचकळ्यात

ADVERTISEMENT
18 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT