आयुष्य हे कोणासाठीही थांबत नाही. भूतकाळात जरी दुःखद असला तरी येणारा काळ हा नक्कीच आशादायी असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल महाजनची एक्स वाईफ डिंपी गांगुली. पण आज ती एक आनंदी जीवन जगत आहे.
नुकतंच डिंपी गांगुलीने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची खूषखबर सोशल मीडियावर शेअर केली आणि आपल्या बाळाचे पहिले फोटोजही टाकले. तिनेही पोस्ट शेअर करताच त्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. डिंपीने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलाचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहीलं की, ईस्टर इवला जन्माला आला आमचा बनी ब्लू…आर्यन रॉय. या फोटोत तिच्या मुलाचे क्युट पाय दिसत आहे.
डिंपीने बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्येही भाग घेतला होता. त्या सिझनमध्ये तिच्यासोबत असणारी डियांड्रा हिनेही डिंपीच्या पोस्टवर कमेंट केली. तिने लिहीलं आहे की, बधाई मेरी जान. बिंदू दारा सिंगनेही या पोस्टवर कमेंट केली आहे की, चांगल्या दिवशी त्याचा जन्म झाला आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा.
एकेकाळी डिंपी राहुल महाजनशी 2010 साली आलेल्या ‘राहुल की दुल्हनिया’ रिएलिटी शोमध्ये लग्न केल्यामुळे चर्चेत आली होती आणि नंतर वादग्रस्त कारणांमुळे त्याच्यापासून विभक्त झालेली डिंपी गांगुली. डिंपीने राहुल महाजनपासून घटस्फोट घेतल्यानंतर 2015 साली रोहित रॉयशी लग्न केलं. डिंपी आणि रोहितला एक मुलगीही आहे. डिंपी सध्या फ्रान्समध्ये आहे. तिकडे ती आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे.
डिंपीने मॉडेलिंगसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. डिंपीने 2010 साली आलेल्या ‘तुझ संग प्रीत लगाई सजना’ या मालिकेपासून तिच्या करियरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने ये रिश्ता क्या कहलात है, कहानी चंद्रकांता की, ससुराल गेंदा फूल आणि एक हजारों में मेरी बहना है या मालिकांमध्ये काम केलं होतं. तसंच तिने रिएलिटी शो बिग बॉस 8 सोबतच नच बलिए 5 सिझनमध्येही भाग घेतला होता.
जिच्या पोस्टर्सनी सजवली होती रूम तिलाच दिला 21 वर्षानंतर घटस्फोट
खरंतर डिंपीही तिच्या अभिनयातील करियरपेक्षा राहुल महाजनसोबतचा घटस्फोट आणि त्याबाबतच्या काही फोटोजमुळे जास्त चर्चेत आली होती. या फोटोजमध्ये डिंपीच्या चेहऱ्यावर मारहाणीची चिन्ह होती. ही मारहाण तिला राहुलने केल्याची तेव्हा चर्चा होती. राहुलपासून विभक्त झाल्यावर डिंपीने तिच्या बालपणीच्या मित्राशी रोहित रॉयशी लग्न केलं आणि आज ती सुखी आहे.
POPxoMarathi कडून डिंपी आणि रोहितचं खूप खूप अभिनंदन.
लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच ही अभिनेत्री घेतेय घटस्फोट
हेही वाचा –
ब्रेकअप झाल्यानंतरही बेस्ट फ्रेंड्स आहेत हे सेलिब्रिटी कपल्स