बॉलीवूड अभिनेत्री रायमा सेन करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

बॉलीवूड अभिनेत्री रायमा सेन करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

बॉलीवूड अभिनेत्री रायमा सेनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. रायमा सेन लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘अन्य’ या तिच्या आगामी चित्रपटातून ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अन्य हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून प्रदर्शित होणार आहे.  रायमा सेनने आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटात काम केलेलं आहे मात्र मराठीत ती पहिल्यांदाच दिसणार आहे. रायमा सेन दिग्गज अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आणि सुचित्रा सेन यांची नात आहे. सहाजिकच तिला मराठी चित्रपटात पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

Instagram

‘अन्य’ मध्ये अनेक बॉलीवूड आणि मराठी कलाकारांची मांदीआळी

‘इनिशिएटिव्ह फिल्म्स’च्या बॅनरखाली ‘कॅपिटलवुड्स पिक्चर्स’च्या सहयोगाने ‘अन्य’ची निर्मिती करण्यात आली आहे. रायमाप्रमाणेच सिम्मी जोसेफ हे दाक्षिणात्य दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे मराठीसह हिंदीमध्ये पदार्पण करीत आहेत. बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मराठमोळे कलाकार ‘अन्य’मध्ये असणार आहेत. अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, भूषण प्रधान, तेजश्री प्रधान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असतील. या कलाकारांसोबत कृतिका देव, सुनील तावडे,गोविंद नामदेव, यशपाल शर्मा देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटात बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदिआळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

‘अन्य’ एक वास्तववादी कथा

‘अन्य’ चित्रपटाचे कथानक मानव तस्करीवर आधारित आहे. एका डॉक्युमेंट्रीच्या दृष्टिकोनातून समाजात घडणा-या वास्तववादी घटनांचा वेध घेत एक भयाण सत्य मांडण्याचा प्रयत्न ‘अन्य’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दिग्दर्शनासोबतच सिम्मी यांनी या चित्रपटाची कथा-पटकथादेखील लिहीली आहे. जेएनयूमध्ये पीएचडी पूर्ण केलेल्या सिम्मी यांनी ‘द आर्ट ऑफ सत्याग्रह अँड द मसीहाज’ या पुस्तकाचं लेखनही केलं आहे. त्यामुळे लेखनाचा दांडगा अनुभव असणा-या सिम्मी यांच्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना ‘अन्य’मध्ये अनुभवायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे महेंद्र पाटीलने परिस्थिती आणि प्रसंगानुरूप मराठी सिनेमाचं अर्थपूर्ण संवादलेखन या चित्रपटासाठी केलं आहे. सिनेमॅटोग्राफर साजन कालाथील यांनी या सिनेमाचं छायांकन केलं आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार विपीन पाटवा यांच्यासह रामनाथन, रिषी एस्, आणि कृष्णाराज यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं असून, रोहित कुलकर्णा यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. डॉ. सागर आणि संजीव सारथी यांनी हिंदी गीते लिहिली असून प्रशांत जामदार यांनी मराठी गीतांची सांभाळली आहे. प्रॉडक्शन डिझाईन शेखर उज्जयीनवाल यांनी केलं असून सहाय्यक दिग्दर्शकाची बाजू नंदू आचरेकर, रॉबिन आणि राजू यांनी सांभाळली आहे. कोरिओग्राफी साभा मयूरी यांनी केली आहे, तर निलम शेटये यांनी कॉस्च्युम डिझाईन केलं आहे. थनुज यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे. या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून सध्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम वेगात सुरू आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात ‘अन्य’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

हिरकणी’ येत आहे प्रेक्षकांचं मन जिंकायला..

अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाबहेब फाळके पुरस्कार जाहीर

दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची ‘दुर्मिळ’ छायाचित्रं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात