रितू नंदा यांचं निधन, कपूर कुटुंबावर शोककळा

रितू नंदा यांचं निधन, कपूर कुटुंबावर शोककळा

कपूर कुटुंबातील रितू नंदा अर्थात ऋषी कपूरच्या मोठ्या बहिणीचं निधन झालं आहे. राज कपूर यांची कन्या रितू नंदाचं कर्करोगाच्या आजाराने निधन झालं. रितू नंदा या 71 वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून रितू कर्करोगाशी झुंज देत होत्या. उद्योगपती राजन नंदा यांच्या आई असणाऱ्या रितू नंदा या स्वतः उद्योजिका होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा निखिल नंदा, सून श्वेता बच्चन नंदा, नातू अगस्त्य आणि नात नव्या नवेली नंदा असं कुटुंब आहे. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार येणार असल्याची माहिती रितू नंदाचे यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी दिली आहे. 

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' सिनेमाचं पोस्टर लाँच

रितू नंदा स्वतः उद्योजिका

रितू नंदा यांच्या निधनाची बातमी त्यांची भाची रिद्धीमा कपूर आणि वहिनी नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. रितू नंदा आणि कपूर यांचे अगदीच जवळचे संबंध होते. त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिचं लग्न रितू नंदा यांच्या मुलाशी झालं असून बच्चन आणि नंदा घराण्याचेही अतिशय जवळचे आणि चांगले संबंध आहे. रितू नंदा यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार करण्यात येणार असून अमिताभ बच्चन आणि अन्य बरेच कलाकार त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहचले. रितू नंदा या स्वतः उद्योजिका होत्या. मात्र कपूर घराण्यातील कोणत्याही मुली आधी चित्रपटात येत नसल्याने रितू यांनी कधीही चित्रपटात काम केलं नाही. मात्र उद्योजिका म्हणून त्यांनी नंदा यांना त्यांच्या कामात मदत केली. 

दीपिकाला माझ्यासारख्या सल्लगाराची गरज- बाबा रामदेव

नीतू कपूर यांची भावनिक पोस्ट

नीतू कपूर यांचं कपूर कुटुंबातील सर्वांशीच अतिशय सलोख्याचं नातं आहे. रितू नंदाबरोबर तर नणंद भावजय या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं अधिक होतं. त्यामुळे नीतू कपूर यांनी रितू नंदाबद्दल भावनिक पोस्ट शेअर केली आहे. रितू आणि नीतू या नेहमीच एकमेकांसह वेळ घालवात होत्या आणि अनेक ठिकाणी फिरायला जाताना अथवा अनेकवेळा पार्टी एकत्र करताना दिसायच्या. त्यामुळे रितू या नीतू यांच्या अतिशय जवळच्या होत्या. त्याव्यतिरिक्त रितू अतिशय समाजिक व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांनी केवळ राज कपूरची मुलगी ही आपली ओळख न राखता एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. रणधीर, ऋषी, रितू, रिमा, राजीव अशी राज कपूर यांची पाच मुलं असून प्रत्येकाने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 

अग्गंबाई सासुबाई मालिकेत साजरी होणार शुभ्राची पहिली संक्रांत

श्वेता बच्चननेही आपल्या सासूच्या पावलावर टाकलं पाऊल

श्वेता बच्चननेदेखील आपली सासू रितू नंदा यांच्या पावलावर पाऊल टाकत उद्योजिका बनण्याचं स्वप्नं साकारलं आहे. रितू आणि श्वेता बच्चन यांचं नातंही नेहमी लोकांसमोर आदर्श सासू आणि सून असंच आतापर्यंत आलं आहे. श्वेताने नेहमीच रितू यांना त्यांच्या कामात साथ दिली. तसंच कपूर आणि नंदा यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून श्वेताने आपली कर्तव्य केली असल्याचंही नेहमीच दिसून आलं आहे. त्यामुळे रितू यांच्या जाण्याने कपूर, बच्चन आणि नंदा या तीनही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रितू नंदा यांची दोन्ही नातवंडं नव्या आणि अगस्त्य हे दोघेही नेहमी मीडियामध्ये दिसत असतात. पण या दोघांनाही बॉलीवूडमध्ये यायचं नाही असं सांगण्यात येत आहे.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.