रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा अडकणार लग्नबेडीत

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा अडकणार लग्नबेडीत

2018 प्रमाणेच 2019 मध्ये सेलिब्रिटी लग्नांना सुरूवात झाली आहे. बॉलीवूडनंतर आता टॉलीवूडमध्ये ही लग्नसराई सुरू झाली आहे. सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची कन्या सौंदर्या (Soundarya) पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. सौंदर्या ही रजनीकांत आणि लता रजनीकांत यांची छोटी मुलगी आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करून सौंदर्याने ही बातमी आपल्या फॅन्सना दिली. येत्या 11 (फेब्रु) तारखेला उद्योगपती विशागन वनंगमुदी याच्याशी तिचा विवाह होणार आहे. याबाबतच्या ट्वीटमध्ये तिने सांगितलं की,लग्नाच्या तयारीला सुरूवात


49756214 586981145074720 5303806512132510059 n


रजनीकांत यांच्या घरी सौंदर्याच्या लग्नसराईला सुरूवात झाली आहे. सोशल मीडियावर याचे काही फोटोजसुद्धा व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये सौंदर्याची आई लग्नाची तयारी करताना दिसत आहे. सौंदर्याचं लग्न चेन्नईमधील रजनीकातं यांच्या पॉईस गार्डन स्थित घरी होणार आहे. सौंदर्याची आई लता रजनीकांत सध्या लग्नाच्या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देत आहे. तसंच या लग्नासाठी खास सुरक्षा व्यवस्था ही ठेवण्यात आली आहे. सूत्रानुसार 9 फेब्रुवारीपासून संगीत आणि मेंहदी यासारख्या कार्यक्रमांना सुरूवात होईल. तसंच 12 फ्रेबुवारीला रजनीकांत यांच्या घरीच ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे.रजनीकांत यांचे प्रयत्न पडले अपुरे


soundarya-rajanikanth-wedding-3
सौंदर्या रजनीकांत हिचं हे दुसरं लग्न आहे. 2010 साली तिने उद्योगपती अश्विन राजकुमार याच्याशी लग्न केलं होतं. पण ते लग्न काही फार काळ टिकलं नाही आणि आपापसांतील मतभेदांमुळे सौंदर्या आणि अश्विन यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2016 साली या त्या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. अश्विन आणि सौंदर्या या दोघांना वेद नावाचा एक मुलगाही आहे.

सौंदर्याचा होणारा नवरा विशागन याचंही हे दुसरं लग्न आहे. त्याच पहिलं लग्न एका वर्तमानपत्राच्या संपादक असलेल्या कनिखा कुमारन हिच्याशी झालं होतं. पण त्यांचा ही घटस्फोट झाला. खरंतर रजनीकांत यांनी आपली मुलगी सौंदर्या हीचं वैवाहीक जीवन वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं नाही आणि अखेर सौंदर्या आणि अश्विन वेगळे झाले.


सौंदर्याची टॉलीवूडमधील घौडदौड


सौंदर्याने 2014 साली तामिळ चित्रपट Kochadaiiyaan ची निर्मिती केल्यानंतर ती चर्चेत आली होती. दिग्दर्शनातील तिचा हा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटाची खासियत म्हणजे आपले वडील रजनीकांत यांच्यासोबत तिने यात काम केलं होतं.सौंदर्याचा होणारा नवरा विशनन यानेही तामिळ चित्रपटात डेब्यू केला असून 2018 साली तामिळ थ्रीलर Vanjagar Ulagam मधून त्याने डेब्यू केला.


soundarya-rajanikanth-wedding-5


सौंदर्याला मोठी बहीण असून तिचं नाव ऐश्वर्या धनुष आहे.


soundarya-rajanikanth-wedding-4


जिचं लग्न दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता धनुषशी झालं आहे. त्या दोघांचं लग्न 2004 साली झालं असून ऐश्वर्या ही गायिका आणि दिग्दर्शिका आहे.


फोटो सौजन्य : Instagram


हेही वाचा -


अभिनेत्री अॅमी जॅक्सनला करायचंय 'या' खास ठिकाणी लग्न


दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड चढणार बोहल्यावर, फेब्रुवारीमध्ये लग्न?


सिद्धार्थ - मिताली #tinypanda चा झाला साखरपुडा