राजेश कुमार ऊर्फ रोसेश साराभाईला झाला कोरोना, दिली माहिती

राजेश कुमार ऊर्फ रोसेश साराभाईला झाला कोरोना, दिली माहिती

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मालिकेतील रोसेश साराभाईची भूमिका अजरामर करणारा अभिनेता राजेश कुमारला कोरोना झाल्याचे त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे. देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे पण आनंदाची बाब ही आहे की तितक्याच प्रमाणात रूग्ण बरेदेखील होत आहेत. 33 लाख संक्रमित लोकांमध्ये 25 लाखापेक्षा अधिक लोक यातून मुक्त झाले आहेत. कोरोनाने इंडस्ट्रीमधील अगदी अमिताभ बच्चन यांनाही नाही सोडले. आता कोरोनाच्या विळख्यात अडकला आहेत तो राजेश कुमार. सध्या राजेश कुमार ‘एक्सक्यूज मी मॅडम’ मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त होता. त्याचवेळी त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वडिलांच्या धमकीला घाबरून अभिनेत्रीने सोडले घर, केला आरोप

कोणतेही लक्षण नाही मात्र क्वारंटाईन

राजेश कुमारला इतर कोणतेही कोरोनाचे लक्षण दिसून आले नाही. केवळ त्याच्या तोंडाची चव गेली असून त्याला वास नीट घेता येत नाही. त्यामुळे त्याला आता क्वारंटाईन करण्यात आले आहे. राजेश कुमारने स्वतःच ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे. ट्विट करून राजेशने सांगितले, ‘माझ्या सर्व चाहत्यांना मी सांगू इच्छितो की, मला कोरोना झाला आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेसाठी मी मनापासून तुमचा आभारी आहे. लवकरच तुम्हाला एक्सक्यूज मी मॅडमद्वारे स्टार भारतवरून भेटेनच. सर्वांना खूप सारे प्रेम.’ राजेश कुमार लवकर या मालिकेत दिसणार असून त्याच्याबरोबर सुचेता खन्ना त्याच्या पत्नीच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. राजेश कुमार गेले कित्येक वर्ष मालिकांमधून काम करत असून कॉमेडीमध्ये राजेश कुमारचे खूपच नाव आहे. तसंच त्याने अनेक चित्रपटांमधूनही काम केले आहे. याशिवाय राजेश कुमारचे नाव त्याच्या शेतीच्या प्रेमासाठीही घेतले जाते.

तसंच राजेशकुमारने सांगितले की, काही दिवसांपूर्वी गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारात गेला असता कदाचित तिथेच संक्रमित झाले असावे. पण कोणतीही लक्षणं दिसली नसली तरीही अंगात शक्ती नसल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे काळजीने त्याने होम क्वारंटाईन होण्याचे ठरविले आहे. आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होऊ नये यासाठीच राजेश कुमारने हे पाऊल उचलले आहे. टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काही वेळासाठी नर्व्हस झालो पण त्यानंतर मी न घाबरता माझ्या मजल्यावरील शेजाऱ्यांनाही कळवले आणि आता आम्ही सर्व क्वारंटाईन आहोत. आमच्या शेजाऱ्यांनीही आम्हाला चांगली साथ दिली आहे. 

दरम्यान आता कोणतीही लक्षणं नसून आपल्या निर्मात्यांना कळवले आहे आणि त्यांनी देखील योग्य काळजी घेतली असल्याचेही राजेश कुमारने सांगितले आहे. तसंच जास्तीत जास्त वेळ झोपत असून आराम घेत असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. सध्या 14 दिवस क्वारंटाईन राहणार असल्याचेही राजेशने सांगितले आहे.

Good News: विरूष्काने दिली गोड बातमी, लवकरच येणार पाहुणा

शेतीविषयक आहे जास्त प्रेम

राजेश कुमारने आपल्या गावाला शेती सुरू केली आहे. उरलेल्या वेळात आपल्या शेतात शेती करून ऑर्गेनिक भाज्या पिकवायचं काम राजेश कुमार करत असतो. तसंच आपल्याला शेती करायला आवडत असून हीच आपली खरी ओळख असल्याचंही त्याने याआधी सांगितलं होतं. मुंबईतदेखील त्याने काही भाज्या घरात लावल्या असून घरात त्याचा उपयोग करण्यात येतो. त्याला त्याची पत्नी यामध्ये साथ देते आहे.

मोहित मलिक त्याच्या आगामी मालिकेसाठी शिकतोय ही भाषा

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा