राजकुमार रावचा ‘स्त्री’ हा भयपट प्रंचड गाजला. मागील वर्षी स्त्री चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत जवळजवळ 100 कोटींची कमाई केली. स्त्रीमध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या प्रमुख भूमिका होत्या. आता स्त्रीच्या यशानंतर राजकुमार राव आता आणखी एका भयपटासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या आगामी भयपटाचे नाव ‘रुहअफ्जा’ असून त्यामध्ये त्याच्यासोबत 'फुकरेफेम' वरूण शर्मादेखील त्याच्यासोबत असणार आहे. रुहअफ्जाची निर्मिती दिनेश विजन आणि मृगदीप सिंग लांबा करत आहेत. शिवाय या चित्रपटाची कथा गौतम मेहरा आणि मृगदीप सिंग लांबा यांनी लिहीली आहे. हे कथानक उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणावर आधारित आहे. शिवाय या चित्रपटात राजकुमारसोबत कोणती अभिनेत्री असणार हेदेखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. वरूण शर्माने त्याच्या इन्स्टा अंकाऊंटवरून या चित्रपटाची माहिती शेअर केली आहे. रुहअफ्जा 2020 प्रदर्शित होणार आहे. रुहअफ्जा चित्रपट हॉरेर कॉमेडी असल्याने भितीसोबतच यातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजनेदखील होणार आहे.
View this post on Instagram
राजकुमार राव आणखी एका भटपटासाठी सज्ज
राजकुमारच्या अनेक चित्रपटातील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. राजकुमार नेहमीच निरनिराळ्या भूमिका करत असतो. शिवाय त्याच्या भूमिका वेगळ्या धाटणीच्या असतात. भयपटाबाबत विचार केल्यास त्याच्या रागिनी एमएमएसमध्येही त्याची वेगळी भूमिका होती. शिवाय एक लडकी को देखा तो ऐैसा लगा, न्यूटन, ट्रॅप, मेड इन चायना, मेंटल है क्या, शादी मेैं आना जरूर, बरैली की बर्फी, फनैखान अशा अनेक चित्रपटातून त्याच्या निरनिराळ्या भूमिकांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. सहाजिकच आता रुहअफ्जामध्ये राजकुमारची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं उस्तुकतेचं ठरणार आहे.
राजकुमार राव आणि वरूण शर्मा पहिल्यांच एकत्र
रुहअफ्जा मध्ये राजकुमार राव आणि वरूण शर्मा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. वरूण शर्मा फुकरे चित्रपटातून लोकप्रिय झाला.वरूणचा कॉमेडी सेन्स जबरदस्त आहे. या चित्रपटातून वरूण शर्मा ‘चुचा’ या नावाने प्रसिद्ध झाला. वरूण शर्माने आतापर्यंत फुकरे, डॉली की शादी, दिलवाले, रब्बा मै क्या करू अशा अनेक चित्रपटातून विनोदी भूमिका केल्या आहेत. आता रुहअफ्जा मध्ये राजकुमार सोबत तो नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत त्याच्या चाहत्यांना उत्कंठा लागली आहे.
कार्तिक- क्रितीच्या 'लिव्ह ईन रिलेशन'वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप
जेव्हा होणाऱ्या सूनेसोबत सासू-सासऱ्यांनीही धरला ठेका
निक जोनाससोबत पिग्गी चॉप्स आली भारतात,शेअर केला फोटो
‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने सोनू निगमने पहिल्यांदा गायली सर्व गाणी
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम