राखी सावंतला वाटतेय कोरोना व्हायरसची भीती, म्हणाली…

राखी सावंतला वाटतेय कोरोना व्हायरसची भीती, म्हणाली…

काहीही म्हणा देशात किंवा जगात कोणतीही घटना घडली की राखी सावंत काहीतरी करतेच.म्हणजे तिला त्यावर व्यक्त व्हायचं असतंच. साधारण दोन महिन्यांपासून जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने आता देशातही भीती निर्माण केली आहे.या आजाराला घाबरुन राखी सावंतने एक व्हिडिओ केला आहे जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राखीने कोरोना व्हायरसची लागण लोकांना होऊ नये म्हणून नेमकं काय करण्याचा सल्ला दिला आहे ते जाणून घेऊया.

हिरकणी येतेय तुमच्या घरी

राखी म्हणते खेळू नका रंगपंचमी

आता काहीच दिवसांवर रंगपंचमी आली आहे. या दिवशी रंगाची उधळण आणि पाण्यात खेळले जाते. हा खेळ खेळताना कोरोना पसरण्याची अधिक शक्यता आहे म्हणूनच यंदा कोणीही रंगपंचमी खेळू नका असे राखी या व्हिडिओमधून सांगत आहे. राखीने दिलेली माहिती खरंच समजून घेण्यासारखी आहे. आपल्याकडे येणाऱ्या अनेक गोष्टी या मेड इन चायना असतात. फुगेही चायनामधून येतात. जर त्यावेळी कोरोना व्हायरस होता की नव्हता ते माहीत नाही.  त्यामुळे त्यापासून सावध राहण्यासाठी तुम्ही रंगपंचमी खेळू नका् असा सल्ला दिला आहे. 

अमिताभ बच्चनच्या या हिट गाण्यावर थिरकणार असीम आणि जॅकलीन

होळीवरुन पोहोचली दिल्लीत

आता कोरोना व्हायरसची माहिती देत असतानामध्येच ती या व्हिडिओतून थेट दिल्लीमध्ये गेली. दिल्लीत सुरु असलेल्या सगळ्या प्रकरणावर ती बोलू लागली. त्यामुळे झालं असं की, राखी नेहमीच अशा पद्धतीचे नाटक करते अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. राखी सावंत दिल्ली सुरु असलेल्या प्रकारावर बोलतना इतकी नाटकी झाली की, मग हा व्हिडिओ पाहावासा वाटत नाही. पण कोरोना संदर्भातील तिची भीती आणि काळजी अगदी रास्त आहे बरं का!  त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला विसरु नका. 

राखी आणि तिचं लग्न

Instagram

राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या लग्न प्रकरणावरुन चर्चेत होती. राखीने लग्नाच्या गाऊनमधील फोटो शेअर केले. पण लग्नाच्या विधींचे किंवा नवऱ्याचे कोणतेही फोटो तिने शेअर केले नाहीत. त्यामुळे तिने लग्न केले की नाही ही लोकांना आधीच शंका होती. पण राखीने समोर येऊन मी एका NRI शी लग्न केले असे सांगितले. त्याचे नाव रितेश आहे असे सांगितले. पण तिने कधीही त्याचा चेहरा कोणाला दाखवला नाही. शिवाय तिने या व्हिडिओमध्ये मंगळसूत्रही घातलेले नाही. 

राखी सावंत आणि तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट

राखी सावंत सोशल मीडिया क्वीन आहे. ती तिच्या अकाऊंडरुन काहीना काही पोस्ट करतच असते. तिच्या अकाऊंटवर तिचेच फोटो नसतात. अनेकांचे टिकटॉक व्हिडिओसुद्धआ असतात. त्यामुळे तुम्हाला जर एंटरटेन्मेंट करुन घ्यायचे असेल तर मात्र तुम्ही राखी सावंतचे इन्स्टा अकाऊंट पाहायला हवे. आयटम डान्सर अशी ओळख असलेली राखी आणि तिची गाणी फारच प्रसिद्ध आहे. अनेक हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपटांच्या आयटम साँगमध्ये ते थिरकली आहे. 


इतरवेळी राखी जे काही सांगते त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल पण यंदा तिने दिलेला सल्ला नक्की ऐका कारण तो आपल्याच फायद्याचा आहे. 


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.