‘इन्टरटेन्मेंट’ या शब्दाला खऱ्या अर्थाने जागणारी राखी सावंत दिवसागणिक प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन करताना Bigg Boss च्या घरात दिसत आहे. चॅलेंजर्सच्या रुपात या घरात आलेल्या राखी सावंतचा वेगळाच अंदाज या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून लोकांना दिसला आहे. एका कोपऱ्यात बसून कायम स्वत:शीच संवाद साधणारी राखी अनेकांना इतकी आवडते की, तिच्याचमुळे या शोचा टीआरपी वाढू लागला आहे. राखी सावंत या शोमध्ये मजा आणण्यासाठी रोज नवा लुक करताना दिसते. कधी ती ज्युली बनते, कधी ती बनते डॉक्टर तर आता तिला व्हायचे आहे गायक… गायक होण्यासाठीचा तिचा रियाज तिने या बिग बॉसच्या घरात सुरु केला असून तिचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोटपोट हसायला होईल यात काहीही शंका नाही.
आता अभिज्ञा भावेच्या हटके मंगळसूत्राची चर्चा, खास आहे डिझाईन
राखी- गायक आणि रियाज
बिग बॉसच्या पेजवर एक नवा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये राखी एका कोपऱ्यात चहाचे घोट घेत गायक होण्याची इच्छा व्यक्त करते. गायक होण्यासाठी रियाज महत्वाचा आणि सूर महत्वाचे म्हणून चहाचा तोच कप हातात घेऊन ती गाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण राखी एखादी गोष्टी किती गांभीर्याने घेते ते काही सांगायला नको. तिने एकदा मनाशी ठरवले की, काही काळासाठी का असेना ती त्या वेषात सगळ्यांचे मनोरंजन करताना दिसते. ती एका बाजूला गातेय आणि दुसऱ्या बाजूला तिला कावळ्याची काव काव साथ म्हणून मिळतेय. त्यानंतर जे होतं ते या व्हिडिओमध्ये पाहण्यासारखे आहे. अनेकदा शब्दांच्या मर्यादा ओलांडूनही राखी लोकांना आवडते कारण ती जे काही करते ते निरागसपणे करते. खेळ हा तिच्यासाठी महत्वाचा असला तरी ती जे करते ते अनेकांना आवडते. म्हणूनच राखी सगळ्यांच्या आवडीची आहे.
Bigg Boss 14 : विकास गुप्ता करणार या अभिनेत्यांवर मानहानीचा दावा
राखीला बसतो सलमानचा ओरडा
राखी सावंत ही सलमानची देखील आवडती स्पर्धक आहे. घरात सतत काही ना काही करत ती चर्चेत असते. यामध्ये भरपूर मनोरंजन असते. पण असे करताना राखी सावंत कधी कधी इतकी वाहत जाते की, ती काय बोलतेय हे तिला कळत नाही. त्यामुळे या शो दरम्यान तिच्याकडून बरेच अपशब्दही निघाले आहेत. याच कारणामुळे सलमाननेही तिला धारेवर धरले आहे. पण इतरांच्या तुलनेत सलमान राखीला अधिक पसंत करतो हे त्याच्या वागण्यातून नेहमी कळते. राखीला हवा असलेला मान-सन्मान देत तो तिची बाजू प्रत्येक वेळी धरुन ठेवतो हे देखील दिसले आहे.
राखीच्या लग्नावर प्रश्नचिन्ह
राखीने या सीझनमध्ये आल्यानंतर रितेशचा सातत्याने उल्लेख केला होता. रितेशसोबत लग्न झाल्याचे सांगितले. पण जसा काळ जात गेला तसं ती मनोरंजनाच्या नावाखाली अभिनव शुक्लाच्या मागे फिरताना दिसली. या काळात ती इतक्यांना दुखावली गेली की, रितेश कोणी नाही असे सांगून देखील मोकळी झाली. रितेशचे दुसरे लग्न झालेले आहे म्हणून तो येत नाही अशी कारणं तिने दिली होती. पण राहुल महाजन सपोर्टर म्हणून पुन्हा आल्यानंतर राखी रितेश कोणी नाही हे सांगत तिला लग्न कर. त्यासाठी चांगला मुलगा शोधू असे देखील सांगितले. त्यामुळे आता राखीने खरंच लग्न केलयं नाही केलयं हे आता कळेनासे झाले आहे.
या सगळ्या गोष्टी वगळता राखीचे आतापर्यंत व्हायरल झालेले व्हिडिओ सगळ्यांनी बघावे असे आहेत.
सारा अली खानने काढली अक्कलदाढ, शेअर केला मजेशीर व्हिडिओ