‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतने या गोष्टीसाठी लावलाय ‘कानाला खडा’

‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतने या गोष्टीसाठी लावलाय ‘कानाला खडा’

‘कानाला खडा’ हा चॅट शो सध्या टेलीव्हिजन माध्यम गाजवत आहे. शुक्रवारच्या भागात कानाला खडा या शो मध्ये चक्क ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतने हजेरी लावली होती. राखी सावंतने या कार्यक्रमात तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बिनधास्तपणे उघड केल्या. राखीच्या आयुष्यातील अनेक वादग्रस्त प्रसंग, बोल्ड आयटम सॉंग्ज, लग्नावरील चर्चा, मीडियावर रंगलेले तिचे किस्से अशा अनेक गोष्टी या कार्यक्रमातून तिने अगदी बेधडकपणे सांगितल्या. नृत्यात करिअर करण्यासाठी तिने आयुष्यात कसे प्रामाणिकपणे केले हेही तिने या कार्यक्रमातून सांगितलं. मात्र आयुष्यात लावलेला कानाला खडा सांगताना तिने पुन्हा राजकारणात जाणार नाही हे सांगितलं.

‘आयटम गर्ल’ राखी सावंतचा जलवा


राखी सतत कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरुन मीडियावर चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे ती कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन या नावानेच लोकप्रिय आहे. पण राखीच्या मते तिला जे जे हवं होतं ते तिने अगदी प्रामाणिकपणे मेहनत करुन मिळवलं आणि यासाठी ती देवाची आणि तिच्या चाहत्यांची ऋणी असल्याचं तिने या कार्यक्रमातून सांगितलं. राखीने नृत्यकलेत स्वतःचे हटके स्थान निर्माण करण्यासाठी आयुष्यात केलेल्या सर्व चांगल्या आणि चुकीच्या गोष्टीही या कार्यक्रमात सांगितल्या. आकर्षक दिसण्यासाठी शरीरावर केलेल्या प्लॅस्टीक सर्जरीबाबत सांगताना जेव्हा राखी म्हणाली की, “मी स्टेजवर पण आग लावली आणि स्वतःला पण आग लावली” ही गोष्ट हसवण्यासोबतच अंर्तमुख करणारीदेखील होती. मीटू या संवेदनशील विषयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राखीने सादर केलेलं प्रात्यक्षिक निवेदक संजय मोनेंना अक्षरशः स्टेजवर घाम फुटायला लावणारं होतं. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात काम केलं तरी स्त्री स्वतःचं रक्षण स्वतःच करू शकते हे दिसून आलं. मीटूबाबत तरुण मुलींना सल्ला देताना राखीने ती फुलराणीमधील तुला शिकवीन चांगलाच धडा हे  संवाद तिच्या अनोख्या कडक शैलीतून सादर केले. पिंजरा चित्रपटातील ज्वानीच्या आगीची मशाल हाती आणि इतर आयटम सॉंग्जवर नृत्य सादर करुन राखीने कार्यक्रमाची धगधग कायम ठेवली.

कानाला खडामध्ये आलेले ‘सेलिब्रेटी पाहुणे’


कानाला खडा कार्यक्रमातून सतत नवनवीन सेलिब्रेटी पाहुणे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अभिनेता संजय मोनेंचं अनोखं आणि हटके निवेदन आणि सेलिब्रेटींसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा यामुळे कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, श्रेया बुगडे, भाऊ कदम, अतुल परचुरे अशा अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. दिवसेंदिवस या चॅट शोबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढतच आहे.


rakhi sawant


राखी करणार लॉस एंजेलिसमध्ये दीपक कलालशी लग्न


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम