गुपचूप केलेल्या लग्नानंतर आता राखी सावंत झाली 'आई'

गुपचूप केलेल्या लग्नानंतर आता राखी सावंत झाली 'आई'

सोशल मीडियावर राखी सावंत नेहमी अॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर तिचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. राखी सावंतने गुपचूप केलेलं लग्नतर आजही फॅन्ससाठी चर्चेचा विषयच आहे. कारण अजूनही तिने तिच्या पतीविषयी जाहीर खुलासा केलेला नाही.  आतातर या विषयाला आणखीनच खतपाणी मिळालं आहे. कारण राखीने चक्क तिच्या मुलीचा फोटो तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या फारच व्हायरल होत आहे. 

कोण आहे ही राखीची मुलगी

काही दिवसांपूर्वी राखीने हा व्हिडिओ तिच्या इंन्स्टावर शेअर केला आहे. ज्या व्हिडिओला तिने कॅप्शन दिली आहे की, मित्रांनो आणि माझ्या चाहत्यांनो ही माझी मुलगी आहे. हिला तुमचे आर्शिवाद द्या. वास्तविक या व्हिडिओमध्ये राखीने स्वतःच व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासाठी तिने फोनमधील बेबी फिल्टर वापरलं आहे. ज्यामुळे ती एखाद्या लहान मुलीप्रमाणे दिसत आहे. यावर राखीला सोशल मीडिया युझर्सनी चांगलंच ट्रोल केलं आहे. काहींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की राखीला वेड लागलं आहे. मात्र काहींनी ही जगातील सर्वात क्यूट मुलगी असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये राखीने लिहीलं आहे की, हाय मित्रांनो तुम्ही मला ओळखलंत का, मी राखी सावंतची मुलगी आहे, माझी आई खूपच लोकप्रिय आहे. यासाठीच तिच्या चाहत्यांसाठी मी हा व्हिडिओ केला आहे. 

राखी सावंतचं सिक्रेट वेडिंग

राखी सावंतला नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिवे्ह राहायचं असतं. ज्यासाठी ती सतत काहीना काहीतरी सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामधून ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहू शकेल. तिच्या सिक्रेट वेडिंग, कधीही मीडियासमोर न आलेला नवरा, हनिमून, प्रेग्नन्सीनंतर आता तिच्या या मुलीचा फोटो चर्चेचा विषय आहे. राखी सावंतने केलेलं लग्न खोटं आहे की खरं  याचा अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. राखीने गुपचूप लग्न केल्यावर सगळ्या मीडियाला राखी सावंतचं लग्न आणि तिचा नवरा या बद्दल फारच उत्सुकता लागली होती. राखीनेच दिलेल्या माहितीनुसार तिचा नवरा NRI असून तो परदेशात असल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे रितेशनेनं तिला रितसर लग्नाची मागणी वगैरे घातली होती. लग्नानंतर राखी रितेशला भेटण्यासाठी अमेरिकेला गेली. तिच्या हनीमूनसाठी ती तेथे गेल्याचं तिने त्यावेळी सांगितलं होते. राखी नुसतंच रितेशबद्दल बोलून थांबली नाही तर तिने कुटुंबातील अन्य सदस्यांचाही खुलासा केला होता. रितेशला दोन बहिणी आहेत. रितेशचे कुटुंब अगदी सर्वसामान्य असून सासू-सासरे प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत  असं राखीने सांगितलं होतं. राखी कधी कधी रितेशसाठी स्वयंपाक करतानाही व्हिडिओ शेअर करते. इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं आता तर मात्र या नाटकाची हद्दच झाली. कारण अशा गोष्टी सोशल मीडियावर शेअर करून ती तिच्या चाहत्यांची आणखीनच दिशाभूल करत आहे. त्यामुळे काही चाहते राखीवर नाराज झाले आहेत. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

Viral : ऐश्वर्या राय देणार गोड बातमी...

विकी कौशल आणि कतरिनामध्ये वाढतेय का जवळीक

आधी बाहुबलीचा आवाज आणि आता महाराष्ट्राचे आराध्यदैवत साकारणार शरद