लवकरच राखी सावंत करुन देणार पती रितेशची ओळख

लवकरच राखी सावंत करुन देणार पती रितेशची ओळख

राखी सावंत जे काही करते ते सगळ्यांना नेहमीच खोटे वाटते. पण राखीने ज्या दिवसापासून लग्नाची गोड बातमी दिली आहे. त्या दिवसापासून अगदी आजपर्यंत कोणालाही तिचे लग्न खरे वाटत नाही. पण राखी मात्र आपल्या लग्नाबाबत फारच सिरिअस आहे बरं का! कारण राखीने अखेर तिच्या पतीची ओळख करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी तिने तिच्या नवऱ्याचे नाव सांगतानाही फार वेळ घेतला होता. पण आता ती लवकरच सावंताच्या जावयाचे ‘जावईमुख’ घडवणार आहे. पण हे आम्ही नाही स्वत: राखी सावंतनेच सांगितले आहे. 

आणि भावुक झालेल्या विराटला अनुष्काने सावरले

आखिर ये रितेश है कौन?

रोज काहीना ना काही इन्स्टाग्रामवर शेअर करणाऱ्या राखी सावंतने अचानक तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नववधू लुकमधील फोटो शेअर केला. कपाळावरील सिंदूर पाहून राखीने खरंच लग्न केले की काय अशी चर्चा होऊ लागली. लग्न की फोटोशूट अशी चर्चा होत असताना राखीने स्वत:च लग्न केल्याचे कबुल केले आणि आता खरेच लग्न केले आहे तर मग राखीचा नवरा तर कळायलाच हवा. राखीने तिच्या नवऱ्याचे नाव सांगितले खरे पण हा रितेश कोण असा प्रश्न त्यानंतर सगळ्यांनाच पडला. तुम्हालाही तो पडला असेलच

रितेश लवकर येणार मीडियासमोर

Instagram

रोज नवनवीन खुलासे करणाऱ्या राखी सावंतने आणखी एक खुलासा केला आहे तो म्हणजे ती लवकरच पती रितेशचे सगळ्यांना दर्शन घडवणार आहे. सगळ्या मीडियाला राखी सावंतचे लग्न आणि तिचा नवरा या बद्दल फारच उत्सुकता लागली आहे. पण राखीनेच दिलेल्या माहितीनुसार तिचा नवरा NRI असून तो परदेशात असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे राखीच्या या रितेशनेच तिला लग्नाची मागणी घातली होती. काही दिवसांपूर्वी राखी रितेशला भेटण्यासाठी  US ला गेली होती.  तिच्या हनीमूनसाठी ती तेथे गेल्याचे तिने सांगितले होते. या प्रवासादरम्यानचे भयंकर फोटोही तिने शेअर केले होते.

सासू-सासऱ्यांबद्दल काय म्हणाली राखी

आता राखी रितेशबद्दल बोलून थांबली नाही तर तिने कुटुंबातील अन्य सदस्यांचाही खुलासा केला आहे. रितेशला दोन बहिणी आहेत. रितेशचे कुटुंब अगदी सर्वसामान्य असून सासू-सासरे प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत हे सांगायला मात्र राखी अजिबात विसरली नाही. 

भारती सिंह लवकरच देणार Good News, आई होण्याची आहे इच्छा

बिग बॉसमध्ये येणार राखी- रितेश

राखीने आणखी एक मोठी गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली आहे ती म्हणजे राखी सावंत पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये येणार आहे. आता येणाऱ्या या सीझनमध्ये राखी सावंत तिच्या नवऱ्यासोबत येणार असल्याचे तिने सांगितले आहे. पण तिच्या या वक्तव्यावर कोणताही ठोस पुरावा नाही. आता राखी तिच्या रितेशचे दर्शन याच कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवणार असेल तर जरा कठीणच आहे.

काय करतेय राखी

राखी सध्या तरी तिच्या  56 सुरी या गाण्याच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहेत. हा तिचा नवा अल्बम असून तिने यासाठी बरीच मेहनत घेतल्याचे तिने सांगितले आहे. 

*तर आता  सावंताच्या राखीचे जावईमुख पाहण्यासाठी सज्ज व्हा… राखी कधी रितेशची ओळख मीडियाला करुन देईल हे सांगता येत नाही. 

आलियाला सोडून रणबीर सतत दिसतोय एक्स गर्लफ्रेंड्ससोबत

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.