काय आहे राखी सावंतच्या गुपचूप लग्नामागचं रहस्य

काय आहे राखी सावंतच्या गुपचूप लग्नामागचं रहस्य

राखी सावंत म्हटलं की काही ना काहीतरी 'ड्रामा' हा असणारच. राखी सावंतच्या प्रोफेशनल आणि खाजगी आयुष्यात सतत काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी  सुरूच असते. ज्यामुळे तिला इंडस्ट्रीत 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' असंच म्हटलं जातं. वाद आणि राखीचं एक अनोखं नातंच आहे. ज्यामुळे ती नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. शिवाय तिच्या विषयी या अशा बातम्या जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तिचा स्वतःचा असा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. राखीच्या विरोधात बोलणारे जितके लोक आहेत तितकेच तिच्यावर प्रेम करणारे लोकही आहेत. राखी सावंत आणि तिचं लग्न हादेखील एक चर्चेचा विषय आहे. अनेक वर्षांपासून तिच्या लग्नाच्या बातम्या व्हायरल होत आहेत. आता पुन्हा एकदा राखीने गुपचूप एका एन.आर.आय. सोबत लग्न केल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Instagram

राखी सावंतने का केलं गुपचूप लग्न

राखी सावंतने एका हॉटेलमध्ये गुपचूप एका एन.आर.आय. व्यक्तीसोबत लग्न केल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये फक्त तिने तिच्या कुटुंबियांना आमंत्रित केल्याचं म्हटलं जात होतं. लग्नसोहळ्याची चर्चा होऊ नये म्हणून तिने  साध्या पद्धतीने लग्न केल्याची बातमी पसरली होती. वास्तविक अशी बातमी व्हायरल होण्यामागचं कारण तिचे हे ब्रायडल लुकमधले फोटो आहेत. या ब्रायडल फोटोशूटमुळे राशीच्या लग्नाची अफवा पसरली होती. मात्र राखी सावंतने स्वतःच ही एक अफवा असल्याचं आता स्पष्ट केलं आहे. 

Instagram

राखीचा ब्रायडल लुक

राखी सावंत या फोटोशूटसाठी एखाद्या नव्या नवरीसारखी नटली होती. तिने सफेद रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्यामुळे तिने एखाद्या एन.आर.आय. शी लग्न केल्याची अफवा  पसरली होती. मात्र राखी ला लुकमध्ये फारच छान दिसत होती. तिने या गाऊनवर चंदेरी रंगाची डायमंड ज्वैलरी परिधान केली होती. स्टड टिआरा, मॅचिंग ज्वैलरी हातात फुलांचा बुके, हातावर मेंदी, गाऊनला साजेसा मेकअर, पर्पल रंगाची लिपस्टिकमुळे तिचं नवरीचं रूप अगदी खुलून आलं होतं. जरी तिने खिश्चन नववधूचा लुक केला असला तरी तिने यावर लाल रंगाचा चुडादेखील परिधान केला होता ज्यामुळे तिने एखाद्या हिंदू मुलाशी विवाह केल्याचं वाटत होतं. मात्र राखीने हे फोटोशूट असल्याचं स्पष्ट केल्यामुळे तिच्या लग्नाच्या अफवांना आता पूर्णविराम लागला आहे. 

राखीचा मॅरेज ड्रामा

राखी सावंत तिच्या लग्नामुळे नेहमी चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिने युट्यूबर दिपक कलालशी लग्न केल्याची अफवा पसरली होती. या लग्नाच्या वेडिंग कार्डपासून ते अगदी हनिमून पॅकेजपर्यंत अनेक गोष्टींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शेवटी हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. 2009 साली तर तिने राखी का स्वयंवर या टेलिव्हिजन शोमध्ये सहभाग घेतला होता. ज्यामध्ये तिने इलेश पारूजनवाला या उद्योगपतीशी साखरपुडादेखील केला होता. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. अशा प्रकारे नेहमीच राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत असते. आता मात्र लग्न न करता फक्त ब्रायडल फोटोशूटमुळेच तिच्या लग्नाची अफवा पसरली होती. 

 

अधिक वाचा

New Age मराठी सिनेमाचा चेहरा Sai Tamhankar

जान्हवी आणि इशानच्या रिलेशनशिपबाबत बोनी कपूरचा खुलासा

‘Indian Idol’ फेम मराठमोळा राहुल वैद्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम