राखी सावंतचा हा व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल, अजूनही ती रमलीय बिग बॉसच्या घरात

राखी सावंतचा हा व्हिडिओ पाहून लोटपोट हसाल, अजूनही ती रमलीय बिग बॉसच्या घरात

यंदाचा बिग बॉस जर कोणी हिट असेल तर तो मराठमोळ्या राखी सावंतने. ती कधी काय करेल याचा अंदाज कोणालाही कधीच येऊ शकत नाही. हा अंदाज तर राखीलाही तिच्याबद्दल नाही. बिग बॉस संपून आता दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. तरी बिग बॉसची झिंग राखीच्या डोक्यातून काही उतरलेली दिसत नाही. तिने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती अजूनही बिग बॉसच्या घरात रमलीय असंच वाटतंय. बिग बॉस आणि सलमानचे शब्द तिने एवढे मनावर घेतले आहेत ते या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येते. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तिचा हा लोटपोट करणारा व्हिडिओ आताच्या आता बघा.

बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच करतेय लग्न

घरातील कामं आणि राखी

राखी बिग बॉसच्या घरात असताना किचनमध्ये बरेचदा दिसली आहे. सगळ्यांसाठी जेवण बनवणे तिला आवडायचे. पण काही कामांच्या बाबतीत राखी एकदम आळशी असल्याचे घरात असताना अनेकांचे मत होते. त्यामुळे ही काम करताना ती बरेचदा आळशीपणा करायची. पण या घरात सगळ्यांनाच काम करावी लागतात. या कामांमधून कोणालाही सुटका मिळत नाही. हे आपण सगळेच जाणतो. ही आठवण राखीने घराबाहेर येऊनही कायम ठेवली आहे. कारण राखी त्या घरातून या घरात आल्यापासून फक्त काम करत आहे. भांडी घासणे, बेड आवरुन ठेवणे, लादी पुसणे, कपडे धुणे अशी बरीच काम ती करतानाचा पुरावा असलेला हा व्हिडिओ आहे. आता राखी सावंत एवढी सगळी काम करताना तोंड बंद ठेवून ती काम करेल, असे मुळीच शक्य नाही. राखी ही सगळी काम आपल्या विनोदी कॉमेंट्री देऊन करत आहे.ज्यामुळे हा इतका मोठा व्हिडिओही पाहण्याची इच्छा होते.

‘रुद्रकाल’ मालिकेमध्ये स्वानंद किरकिरे साकारणार निर्दयी आमदार - राजकारण्याची भूमिका

राखीने लावले चार चाँद

राखी सावंतला उगाचच इंटरटेन्मेंट म्हटले जात नाही. यंदाच्या बिग बॉसमध्ये जेव्हा ती एक चॅलेंजर्सच्या रुपात आली त्यावेळी फक्त मनोरंजन डोळ्यासमोर ठेवून तिने सगळे काही केले. मध्येच ज्युली नावाचे भूत बनून, कधी अभिनव शुक्लाच्या मागे लागून… तर कधी अर्शीसोबत भांडून तिने आपले वेगळे अस्तित्व घरात निर्माण केले. तिच्या या वेगवेगळ्या रुपामुळेच ती या खेळात फिनालेपर्यंत पोहोचू शकली. राखीसोबत आलेले अन्य चॅलेंजर्स हे कधीच घराबाहेर पडले पण राखीने आपल्या विनोदाने आणि घरातील वेगवेगळ्या टास्कला वेगळ्या पद्धतीने करण्यामुळे प्रेक्षकांचेही मन जिंकले. घरात भांडणं न करताही फक्ट मनोरंजनाच्या माध्यमातून आनंद आणता येतो हे राखीने दाखवून दिले.

क्या ये सांडनी थी

राखी या हा एकच व्हिडिओ नाही जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. राखीचे अनेक व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती जे काही बोलते त्यातून काहीना काही मीम्स नक्कीच बनतात. ती बिग बॉसच्या घरात आल्यानंतर तिचा आलेला सांडनीचा व्हिडिओही तितकाच गाजला होता. कलर्सनेही तिच्यावर कितीतरी मीम्स बनवले होते. जे खूप जणांना मनापासून आवडले होते. म्हणूनच कॉन्ट्राव्हर्सी क्वीन राखी सावंत लोकांची आवडती राखी  सावंत झाली होती. कोणाकडेही आपल्या अकाऊंटची जबाबदारी न स्विकारता गेलेल्या राखी सावंतला तरीही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. 


सध्या राखी सावंत आपल्याच घरी आहे. पण ती अजूनही या रिअॅलिटी शोच्या प्रेमात आहे. आणि कदाचित पुढचा सीझन येईपर्यंत तिचं हे वागणं असंच सुरु राहणार आहे.

मराठी गाण्यावर मलायकाचा तो जुना व्हिडिओ होतोय व्हायरल