‘कर ले तू भी मोहब्बत’ वेब सिरीजच्या तिसऱ्या भागात काय आहे नवं

‘कर ले तू भी मोहब्बत’ वेब सिरीजच्या तिसऱ्या भागात काय आहे नवं

‘बडे अच्छे लगते है’ हिंदी टेलिव्हिजन मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून झळकलेली राम कपूर आणि साक्षी तन्वर या जोडीला तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. राम आणि साक्षी या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना इतकी आवडली होती की त्यानंतर ‘कर ले तू भी मोहब्बत’ ही वेबसिरीजमध्येदखील या जोडीला चाहत्यांचं तितकंच भरभरून प्रेम मिळालं. या वेबसिरीजचा दुसरा भागदेखील हिट ठरला. आता कर ले तू भी मोहब्बत या वेबसिरीजचा तिसरा भागदेखील प्रेक्षकांना आवडत आहे.

'कर ले तू भी मोहब्बत'च्या तिसऱ्या भागात नेमकं काय आहे...


'कर ले तू भी मोहब्बत'चे या आधीचे दोन्ही भाग चाहत्यांना फारच आवडले होते. पहिल्या भागात करण खन्ना (नायक) आणि टिप्सी (नायिका) चे भांडण आणि त्यानंतर मैत्री दाखविण्यात आली होती. दुसऱ्या भागात ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडून त्यांचं लग्न झाल्याचं दिसलं होतं. मात्र या वेबसिरीजचा तिसरा भाग मेलोड्रामाने भरलेला आहे. कारण या भागात करण आणि टिप्सीच्या लग्नानंतर असं बरंच काही घडतं की ते एकमेकांचा द्वेष करू लागतात असं दाखविण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये त्या दोघांसोबत एक लहान मुलगीदेखील दाखविण्यात आली होती. त्यामुळे असं काय घडतं की करण खन्ना त्यांच जीवापाड प्रेम असणाऱ्या बायकोचा तो द्वेष करू लागतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. 'बडे अच्छे लगते है' आणि 'कर ले तू भी मोहब्बत'च्या या आधीच्या दोन्ही भागांपेक्षा हे कथानक वेगळं आहे. शिवाय राम कपूर आणि साक्षी तन्वरने या प्रकारची भूमिका यापूर्वी कधीच केलेली नाही. त्यामुळे ती दोघंही या भूमिकेबाबत आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियेबाबत फारच उत्सुक आहेत. शिवाय या भागात अभिनेता हितेन तेजवानी आणि अभिनेत्री करिष्मा तन्ना यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे.

कर ले तू भी मोहब्बतचा चौथा भागाचीदेखील तयारी


राम कपूर आणि साक्षी तन्वरला पुन्हा एकत्र पाहण्याची आणखी एक संधी चाहत्यांना लवकरच मिळणार आहे. कारण तिसऱ्या भागानंतर लगेचच या वेबसिरीजच्या चौथा भागाच्या शूटिंगला सुरूवात केली जाणार आहे. रामकपूरने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे. साक्षी तन्वरदेखील ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटातून आणि आमिर खानच्या ‘दंगल’ या हिंदी चित्रपटातून काम केलं आहे. साक्षीने कहानी घर घर की या हिंदी मालिकेतून टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. राम आणि साक्षी यांची  जोडी चाहत्यांना फारच आवडत असल्यामुळे या वेबसिरीजच्या पुढील भागांनादेखील चांगलाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.


FI karrle tu bhi mohabbat


सााराच्या नव्या फोटोशूटमुळे फॅन झाले नाराज, पाहा फोटो


कसौटी जिंदगी की' ची 'प्रेरणा' श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅक


‘कलंक’ ट्रेलर प्रदर्शित, गुंतागुंतीच्या नात्याची कहाणी


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम