‘बडे अच्छे लगते है’ फेम राम कपूरचं ट्रान्सफॉर्मेशन

‘बडे अच्छे लगते है’ फेम राम कपूरचं ट्रान्सफॉर्मेशन

बडे अच्छे लगते है आणि कसम से या मालिकामधून घराघरात पोहचलेल्या राम कपूरचे अनेक चाहते आहेत. राम कपूरने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामधून राम कपूरला ओळखणं कठीण झालं आहे. कारण 45 वर्षाच्या राम कपूरने  आपलं वजन कमी करून स्वतःमध्ये जबरदस्त बदल केला आहे. राम कपूरने जवळजवळ तीस किलो वजन केलं आहे. त्याचा हा लुक पाहून त्याची पत्नी गौतमी कपूरने त्याला या पोस्टवर ‘हॉटी’ अशी कंमेट दिली आहे. 

View this post on Instagram

Wassssup peeps!! Long time no see

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

राम कपूरच्या या मेकओव्हरचं चाहत्यांनी केलं कौतुक

राम कपूरने त्याच्या इंन्स्टा अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. शिवाय त्यासोबतच त्याने चाहत्यांना हाय हॅलो करत बऱ्याच दिवसांमध्ये आपण भेटलो नाही असं म्हटलं आहे. या फोटोमधून त्याने त्याचं वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेलं दिसून येत आहे. या लुकसाठी रामने डाएट आणि व्यायामावर भर दिला आहे. रामचा या फोटोंमधला अंदाजदेखील नेहमीपेक्षा वेगळा आणि हटके वाटत आहे. राम कपूरच्या स्लिम लुक फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी फार चांगल्या कंमेट्स केल्या आहेत. ज्यामुळे रामचा हा लुक सर्वांनाच आवडल्याचं दिसत आहे. काही चाहत्यांनी मात्र त्यांना रामचा पहिला गोलुमोलू लुक आवडत असल्याचं शेअर केलं आहे. 

View this post on Instagram

😘

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

राम कपूरच्या या लुकमागचं कारण काय

राम कपूरने अनेक मालिका आणि चित्रपटातून काम केलं आहे. टेलीव्हिजन मालिका ‘न्याय’मधून रामने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. मागील वर्षी राम कपूर आयुष शर्माच्या ‘लव्ह यात्री’ या चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. राम कपूरने काम केलेल्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. मात्र त्याची आणि साक्षी तन्वरची मुख्य भूमिका असलेली ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका प्रेक्षकांना फारच आवडली होती. या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री इतकी हिट ठरली या दोघांनी पुन्हा ‘कर ले तू भी मोहब्बत’ या वेबसिरिजमधून एकत्र काम केलं. एवढंच नाही तर या वेबसिरिजचे जवळजवळ तीन भाग प्रदर्शित झाले. लवकरच या वेबसिरिजचा चौथ्या भागदेखील प्रदर्शित होणार आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे राम कपूरचा हा मेकओव्हर या वेबसिरिजच्या चौथ्या भागासाठी  असण्याची शक्यता आहे. 

Instagram

राम कपूर कोणत्या भूमिकेसाठी करतोय एवढी मेहनत

राम कपूरचं वजन त्याच्या वयापेक्षा नक्कीच जास्त होतं. ज्यामुळे त्याने त्याचं वजन कमी करण्याची गरज होती. मात्र असं असूनही तो अनेक मालिकांमधून हिट झाला होता. त्याच्या मालिका, वेबसिरिज अथवा चित्रपटांमधील भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. राम कपूरने त्याच्या सक्षम अभिनयाने त्याचं अतीवजनदेखील छान कॅरी केलं होतं. त्यामुळे त्याच्या भूमिकांमधूनदेखील त्याच्या वजनाचा विषय अधूनमधून डोकावत असे. त्याच्या तो गोलमटोल लुकदेखील त्याने निवडलेल्या भूमिकांमधून समरस होत असे. बऱ्याचदा तो त्याच्या भूमिकांमधून वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम करताना दिसत असे. मात्र आता राम कपूरने आता खऱ्या खुऱ्या जीवनातदेखील त्याचं वजन मोठ्या प्रमाणावर कमी केलं आहे. ज्यामुळे तो  अधिक  फिट आणि हॅंडसम दिसत आहे.  राम कपूरने केलेला हा मेकओव्हर पाहून त्याच्या मागचं नेमकं कारण आता चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. लवकरच राम कपूर एखाद्या नव्या भूमिकेत आणि हटके लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे.

 

अधिक वाचा

नीना गुप्ताने घेतला कोणाशी पंगा की व्हिडिओ झाला व्हायरल

'इस प्यार को क्या नाम दूं' फेम बरूण सोबतीच्या घरी आली चिमुकली परी

एकाएकी चर्चेत आलेल्या या अभिनेत्री सध्या काय करत आहेत, जाणून घ्या

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम