लेक कोमोला का जात आहेत रणबीर-आलिया

लेक कोमोला का जात आहेत रणबीर-आलिया

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियासाठी नव्या नाहीत. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबूली दिलेली आहे. बॉलीवूडचे हे नवे लव्हबर्ड्स वेकेशनसाठी युरोप टूरला गेले आहेत. काही दिवसांपासून दोघंही आपापल्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ते युरोपमध्ये एकमेंकासोबत रोमॅंटिक टाईम स्पेंड करण्यासाठी गेवे आहेत. युरोपमध्ये फिरण्यासाठी हा काळ अगदी उत्तम आहे. मात्र सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार आलिया आणि रणबीर लेक कोमोला भेट देण्याची शक्यता आहे. इटलीमधील लेक कोमो सध्या वेडिंग डेस्टिनेशनसाठी लोकप्रिय होत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी या ठिकाणी लग्न करण्यासाठी उत्सुक असतात. बॉलीवूडचं सेलिब्रेटी कपल दीपिका पदूकोन आणि रणवीर सिंह यांनीदेखील लेक कोमोमध्ये लग्न केलं होतं. त्याचप्रमाणे ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा साखरपुडादेखील लेक कोमोमध्येच पार पडला होता. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीदेखील वेडिंग डेस्टिनेशनसाठी इटलीची निवड केली होती. सध्या रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या चर्चांचे वारे बॉलीवूडमध्ये वाहत आहेत. त्यामुळे रणबीर आणि आलिया लेक कोमोला त्यांच्या वेडिंग डेस्टिनेशनची निवड करण्यासाठी गेले असावेत अशी चर्चा आहे.


ranbir alia new


रालियाचे स्वित्झर्लंडमधील फॅनसोबत फोटो व्हायरल


सोशल मीडियावर रालियाचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. यात ते दोघं स्वित्झर्लंडमधील फॅनसोबत दिसत आहेत. आलियाने या फोटोंमध्ये पिंक कलरचा ओव्हरकोट घातला आहे. रणबीरने काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि जीन्ससोबत लेदर जॅकेट घातलं आहे. लवकरच रणबीर आणि आलिया ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

ब्रम्हास्त्र वर्ष अखेरीज प्रदर्शित होण्याची शक्यता


'ब्रम्हास्त्र' हा सुपरहिरो जॉनरमधील चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत अशीदेखील चर्चा आहे की, ब्रम्हास्त्र हा चित्रपट दर दोन वर्षांनी येणार आहे. करणची या चित्रपटासाठीची पुढील तयारी देखील झाली आहे. ब्रम्हास्त्र हा सुपरहिरो प्रकारातील चित्रपट असून त्यात भारतीय पौराणिक कथांचा समावेश असणार आहे. 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट अयान मुखर्जी  दिग्दर्शित असून या चित्रपटाचे नाव आधी ‘ड्रॅगन’ असे ठेवण्यात आले होते. पण नंतर ब्रम्हास्त्र हे नाव निश्चित करण्यात आले. ब्रम्हास्त्र हे असे शस्त्र आहे ज्याचा कोणीच संहार करु शकत नाही. या चित्रपटात आलिया- रणबीरसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा लोगो लाँच झाला. हा चित्रपट वर्षाअखेरीस भेटीला येण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणाjर अशी चर्चा आहे. या चित्रपटाचे शुटींग बुल्गेरीयामध्ये शूट करण्यात येणार आहे.


ranbir alia 2 new


आणखी वाचा


इन्शाअल्लाह’ सलमान आणि आलिया पहिल्यांदाच येणार एकत्र


सडक 2’ मध्ये आलिया भट साकारणार 'ही' भूमिका


आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम