लग्न ठरवण्यापूर्वी रणबीर-आलिया शोधताहेत हनिमूनसाठी जागा

लग्न ठरवण्यापूर्वी रणबीर-आलिया शोधताहेत हनिमूनसाठी जागा

बॉलिवूडचा चॉकेलट बॉय रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या जोडीला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. रणबीर-आलिया या वर्षी  लग्न करणार आहेत, अशी चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. पण दोघांकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भटनं हनिमूनसाठी सुंदर ठिकाण शोधण्यास सुरुवात केली आहे. आलिया आणि रणबीरची नजर सध्या फिनलँड आणि स्वीर्त्झलँडवर आहे. यासारख्याच एखाद्या आलिशान जागेला दोघांची पसंती आहे. दुसरीकडे, ऋषि आणि नीतू त्यांच्या एका निर्माणाधीन इमारतीचं काम पूर्ण करण्यामध्ये  व्यस्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरच्या लग्नानंतर याच इमारतीत पूजेचा कार्यक्रम करण्याची ऋषि आणि नीतू यांची इच्छा आहे. यासाठी नीतू यांनी आपल्या आर्क‍िटेक्टला लवकरात लवकरइमारतीच्या बेसमेंटचं काम पूर्ण करण्यास सांगितलं आहे. रणबीर-आलियाच्या लग्नामुळेच नीतू यांना इमारतीचं बांधकाम पूर्ण करून घेण्याची घाई करत असल्याचं म्हटलं जात आहे.

(वाचा : ‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल)

ऋषि-नीतू यांना झालीय मुलाच्या लग्नाची घाई

‘कृष्णराज’ असं इमारतीचं नाव आहे. ऋषि आणि नीतू यांनी पाली हिल येथील ही इमारत 1980 मध्ये विकत घेतली होती. नीतू आणि ऋषि त्यांची मुलं रणबीर आणि रिद्धिमासोबत या घरात तब्बल 35 वर्ष वास्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी कपूर कुटुंबीयांनी 15 मजल्यांची इमारत पाडण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून परवानगी देखील घेतली होती. पण इमारत पाडण्याचा निर्णय त्यांनी आता बदलला आहे. 

(वाचा : मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज)

‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलिया-रणबीर दिसणार एकत्र

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या वर्षी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. दोघंही सध्या सिनेमाचं शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर- आलिया भटव्यतिरिक्त सिनेमामध्ये महानायक अभिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका आहे. तसंच सिनेमामध्ये मौनी रॉय, नागार्जुन, डिंपल कपाडिया, प्रतीक बब्बर देखील दिसणार आहेत. अभिनेत्री मौनी रॉय 'ब्रह्मास्त्र' मध्ये खलनायिकेची भूमिका साकारत आहे. करण जोहर या सिनेमाचे निर्माते आहेत. मे 2020 पर्यंत सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

(वाचा : शुभमंगल सावधान! वरूण धवन-नताशाचं मे महिन्यात होणार धुमधडाक्यात लग्न)

मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी'

काही दिवसांपूर्वी आलिया भट (Alia Bhatt)चा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आगामी सिनेमा 'गंगूबाई काठियावाड़ी (Gangubai Kathiawadi First Look)'चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये आलिया भट मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. अतिशय लहान वयात देहविक्रीसाठी गंगूबाईंवर जबरदस्ती करण्यात आली होती. देहविक्री करताना कित्येक कुख्यात गुन्हेगार गंगूबाईशी जोडले गेले. या सिनेमाद्वारे गंगूबाई आणि माफिया वर्ल्ड आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट प्रेक्षकांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.