‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल

‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) 2020मध्ये बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमाचं शुटिंग सध्या वाराणसीमध्ये आहे. आलिया (Alia Bhatt)  आणि रणबीरचे वाराणसीच्या राजघाटवर शुटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण यातील रणबीरचा शर्ट काढतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फिरत आहे. रणबीरचा हा फोटो वाराणसीच्या गंगाघाटवरील आहे, ज्यामध्ये रणबीर आणि आलियावर सिनेमातील एका गाणं चित्रित होत असल्याची माहिती समोर आली आहे. फोटोमध्ये आलियानं पांढऱ्या रंगाच्या टॉपसहीत लाल रंगाचं श्रग आणि निळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. तर रणबीर (Ranbir Kapoor) मिलिट्री प्रिंट शर्टमध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्याची कोरिओग्राफी रेमो डीसूझानं केली आहे. या गाण्यातील एका सीनदरम्यान रणबीर आपलं शर्ट काढताना दिसत आहे. कॅमेरासमोर शर्ट काढणाऱ्या रणबीरच्या या फोटोची मोठ्या प्रमाणात प्रचंड सुरू आहे. 

(वाचा : रणवीर सिंह मोठ्या पडद्यावर दिसणार या 'सुपरहिरो'च्या भूमिकेत)

वाराणसीत आठवडाभर सुरू राहणार शुटिंग

वाराणसीत गेल्या शुक्रवारी मुसळधार पाऊस असल्याच्या कारणामुळे सिनेमाचं शुटिंग उशिरानं सुरू करण्यात आलं होतं. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर रणबीर कपूर आणि आलिया भट गुलेरिया घाट पोहोचले. येथे 'ब्रम्हास्त्र'च्या गाण्याचं चित्रिकरण करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार आता वाराणसीमध्ये आठवडाभर सिनेमाचं शुटिंग सुरू राहणार आहे. 

(वाचा : शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ सिनेमानं नोंदवला ‘हा’ नवा रेकॉर्ड)
अयान मुखर्जी दिग्दर्शित सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर- आलिया भटव्यतिरिक्त सिनेमामध्ये महानायक अभिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका आहे. तसंच सिनेमामध्ये मौनी रॉय, नागार्जुन, डिंपल कपाडिया, प्रतीक बब्बर देखील दिसणार आहेत. अभिनेत्री मौनी रॉय 'ब्रह्मास्त्र' मध्ये खलनायिकेची भूमिका साकारत आहे. करण जोहर या सिनेमाचे निर्माते आहेत. मे 2020 पर्यंत सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

(वाचा : लतादीदींना 28 दिवसांनंतर मिळाला डिस्चार्ज, हॉस्पिटलमधील PHOTO VIRAL)

शरीर साथ देत नाही, आता निवृत्त झालं पाहिजे… बिग बींचा भावनिक ब्लॉग

काही दिवसांपूर्वीच 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपला भावनिक ब्लॉग शेअर केला होता.  'वाढतं वय शरीराला सहकार्य करत नाही, त्यामुळे निवृत्त होण्याचा विचार करत आहे', अशा भावना बिग बींनी आपल्या ब्लॉगमधून व्यक्त केल्या होत्या. अमिताभ बच्चन ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची शुटिंग करण्यासाठी  28 नोव्हेंबर रोजी सकाळीच मनालीमध्ये पोहोचले होते. मनालीमधील शुटिंग लोकेशनवर पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल 12 तासांचा प्रवास करावा लागला. या प्रवासासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांसमोर मांडली. शिवाय, इथल्या निसर्गाचं आणि स्थानिकांचंही प्रचंड कौतुक केलं . ‘मनालीतील लोक अतिशय साधी आणि प्रामाणिक आहेत, आपण कधीही त्यांची बरोबरी करू शकत नाही’,असं बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केलं होतं.

‘आता मला निवृत्त झाले पाहिजे...’

बिग बींच्या ब्लॉगमधील पुढील संदेश अतिशय भावनिक होता. ‘पुन्हा एकदा नवीन जागा, नव्या खोलीत स्वतःला सामावून घ्यायचं आहे. आता मला निवृत्त झाले पाहिजे. मेंदू आणि हाताची बोटं परस्परविरोधी काम करत आहेत, हा एक संदेश आहे’,असा आशयाचा ब्लॉग बिग बींना लिहिला होता. दरम्यान, हा एक मेसेज असल्याचं अमिताभ बच्चन यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं होतं. या ब्लॉगमुळे मीडिया इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या निवृत्तीसंदर्भात निरनिराळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली होती. 

वाचा अमिताभ बच्चन यांचा भावनिक ब्लॉग :

https://srbachchan.tumblr.com/

बिग बींवर सुरू होते औषधोपचार

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना चार दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 1983साली झळकलेल्या 'कुली' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान झालेली दुखापत आणि वारंवार उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे अमिताभ बच्चन त्रासल्याची माहिती समोर आली होती. 

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.