रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल, यातलं तथ्य नक्की काय

रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल, यातलं तथ्य नक्की काय

रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी गेल्या वर्षभर चर्चेत आहे. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. असं असतानाच आता रणबीर आणि आलियाचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांना या दोघांनी गुपचूप लग्न केलं असं वाटत आहे. पण यामागचं नक्की तथ्य काय आहे? हेच सर्वांना जाणून घ्यायचं आहे. सध्या रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. पण नक्की हा फोटो कशाचा आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. रणबीर आणि आलिया करत असलेल्या चित्रपटातील आहे की, या जोडीने कोणत्या जाहिरातीसाठी ही वेषभूषा धारण केलेली आहे हे गुपित आता राहिलेलं नाही. 

आलिया आणि रणबीरची एकत्र जाहिरात

एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी आलिया भट आणि रणबीर कपूर हे एकत्र आले आहेत. दोघेही वर आणि वधूच्या वेषात तयार झाले आहेत. या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी हे दोघं वधू आणि वराप्रमाणे सजले आहेत. अगदी आलियानेदेखील आपल्या या लुकचा फोटो शेअर केला आहे. तिने #DulhanwaliFeelling असंही कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आलिया रणबीरबरोबर लग्न करायला उत्सुक असल्याचं दिसून येतंय. या फोटोमध्ये रणबीरदेखील आलियाकडे अतिशय प्रेमाने पाहताना दिसत आहे. या दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे. दरम्यान यावेळी आलियाने लग्नासाठी लेहंग्याची ऑर्डर केली असल्याचंही म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर रणबीरचे वडील आणि आई या महिन्यातच भारतात येणार असून या दोघांच्या लग्नाबाबत बोलणी होणार आहेत असंही सध्या म्हटलं जात आहे. 

आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म

नुकतंच अंबानीच्या घरी एकत्र घेतलं बाप्पाचं दर्शन

आलिया आणि रणबीरने नुकतंच मुकेश अंबानीच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं एकत्र दर्शन घेतलं. या दरम्यान त्यांच्यात असणारी केमिस्ट्री पुन्हा एकदा अनेक कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. त्यांच्याबरोबर अयान मुखर्जीदेखील दिसला होता. मात्र रणबीर आणि आलियाने मीडियासाठी खास पोझ दिली. त्यामुळे लवकरच ही जोडीदेखील लग्नबंधनात अडकेल असा कयास बांधला जात आहे. इतकंच नाही तर या जोडीकडून लवकरच लग्नाची तारीखही कळेल असंही म्हटलं जात आहे. 

‘या’ कारणासाठी आलिया भटला सोडावं लागलं ब्रम्हास्त्रचं शूटिंग अर्धवट

ब्रम्हास्त्र येणार पुढच्या वर्षी

रणबीर आणि आलिया यांची पहिली भेट अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीतील रूपांतर प्रेमात झालं. याच वर्षाच्या शेवटी हा चित्रपट आधी प्रदर्शित होणार होता. मात्र पुढच्या वर्षी या चित्रपटाचं प्रदर्शन ढकलण्यात आलं आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते अगदी आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या दोघांचाही हा एकत्र पहिलाच चित्रपट असेल. दरम्यान या चित्रपटात रणबीर आणि आलियासह अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहे. एका सुपरहिरोची ही कथा असून यामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रणबीरने यावर्षी कोणताही इतर चित्रपट केला नसून वर्षाच्या सुरुवातीला आलियाचा ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. 

‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट