मध्यरात्री करण जोहरला भेटण्यासाठी पोचला रणबीर

मध्यरात्री करण जोहरला भेटण्यासाठी पोचला रणबीर

रणबीरचं सध्या चाललंय काय?, एकीकडे त्याच्या आणि आलियाच्या लग्न होणार असल्याच्या बातम्या येत आहेत तर दुसरीकडे रणबीर मात्र एकटाच फिरताना दिसतोय. हो… नुकतंच चक्क मध्यरात्री Alia Bhatt शिवाय Karan Johar च्या ऑफिसमध्ये Ranbir Kapoor आणि Ayan Mukerji पोचले.

मध्यरात्री भेट का?

या भेटीमागील नक्की कारण अजून समोर आलं नसलं तरी या भेटीदरम्यान रणबीरच्या चेहऱ्यावर अजिबातच हास्य नव्हतं. पण तरीही त्याने मीडियाला पाहून स्माईल नक्कीच दिलं. पण एक गोष्टी प्रकर्षाने या भेटीदरम्यान जाणवली ती म्हणजे आलियाची अनुपस्थिती. कारण आगामी ब्रम्हास्त्रमध्ये आलिया आणि रणबीरची जोडी दिसणार असून करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर अयान मुखर्जी याचं दिग्दर्शन करत आहे. यामध्ये रणबीर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आलिया यांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे. आता संपूर्ण टीममधून एक मेंबर गायब असेल तर शंका येणारच ना. 

रणबीर आणि आलियामध्ये आलाय का दुरावा

बॉलीवूड आणि मीडियामध्ये जरी आलिया आणि रणबीरच्या लग्नाची जोरदार चर्चा असली तरी या दोघांनी मात्र एकदाही यावर भाष्य केलेलं नाही. या भेटीतही रणबीरसोबत आलिया न दिसल्याने या दोघांमध्ये दुरावा तर आला नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. चर्चा आहे की, या दोघांचं शुभमंगल 2020 मध्ये होणार असून म्हणे आलियाचा लग्नाचा लेहंगा सब्यसाची डिझाईन करणार आहे. 

रणबीरचा स्टाईलिश अंदाज

या भेटीदरम्यानही रणबीर चांगलाच स्टाईलिश दिसत होता. चेहऱ्यावर थकवा असला तरीही रणबीर हँडसम दिसत होता. रणबीरने ब्लॅक टीशर्ट आणि पँट घातली होती. एवढंच नाहीतर त्याने ग्रीन कलरची कॅपही घातली होती.

लवकरच येतोय रणबीरचा शमशेरा

एकीकडे ब्रम्हास्त्र तर दुसरीकडे लवकरच वाणी कपूरसोबत रणबीरच शमशेरा हा चित्रपट येत आहे. चर्चा होती की, रणबीरने रस न दाखवल्याने हा चित्रपट डब्यात गेला म्हणून पण नुकतेच या चित्रपटाचे ऑनसेट फोटोज व्हायरल झाले आहेत. हा चित्रपट एक पीरियड ड्रामा असून यामध्ये रणबीरचा डबल रोल असणार आहे. रणबीरच्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये तो पहिल्यांदाच डबल रोल करताना दिसणार आहे.