रणबीर कपूर वाढदिवसः रणबीरच्या प्रेमप्रकरणांचीच चर्चा जास्त, 'कॅसानोव्हा' म्हणून प्रसिद्ध

रणबीर कपूर वाढदिवसः रणबीरच्या प्रेमप्रकरणांचीच चर्चा जास्त, 'कॅसानोव्हा' म्हणून प्रसिद्ध

आपल्या अभिनयाने पहिल्याच चित्रपटापासून आपली ओळख निर्माण केलेला अभिनेता अर्थात बॉलीवूडचा ‘रॉकस्टार’ रणबीर कपूरचा वाढदिवस असून रणबीर 38 वर्षांचा झाला आहे. रणबीरची बहीण रिद्धिमाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचे लहानपणीचे फोटोही शेअर केले आहेत. पण रणबीरच्या चित्रपटांची आणि अभिनयाची चर्चा होते त्याहीपेक्षा अधिक चर्चा होते ती त्याच्या नात्यांबद्दल. गेल्या कित्येक वर्षात रणबीरची इमेज ‘कॅसानोव्हा’ अशीच बनली आहे. इतक्या नात्यांमध्ये रणबीरच्या नावाची चर्चा झाली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याचे नक्की कोणाकोणाशी नाव जोडले गेले हेच पाहणार आहोत. दरम्यान रणबीर सध्या अभिनेत्री आलिया भटला डेट करत असून लवकर हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचेही म्हटले जात आहे. यापूर्वीही त्याने डेट केलेल्या अभिनेत्रींसह तो लग्नात अडकेल असा अंदाज होता. मात्र असे काहीही झाले नाही.

अवंतिका मलिक

चित्रपटांमध्ये येण्याआधी रणबीर कपूर हा इमरान खान याची आताची पत्नी अवंतिका मलिकला डेट करत होता असं म्हटलं जातं. अवंतिका आणि इमरान त्यावेळी नात्यात नव्हते. या दोघांनी एकमेकांना तब्बल 5 वर्ष डेट केले. मात्र रणबीरने त्यानंतर चित्रपटामध्ये यायचं ठरवलं आणि या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. त्यानंतर अवंतिकाने इमरान खानबरोबर लग्न केले. पुन्हा कधीही ही जोडी एकत्र दिसली नाही. 

सोनम कपूर

‘सावरिया’ या चित्रपटातून सोनम कपूर आणि रणबीर कपूर या दोघांनीही बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधीपासून हे दोघे एकमेकांना ओळखत होते. तिच्यासोबतही रणबीरचे नाव जोडण्यात आले होते. मात्र सोनमने आपण कधीही रणबीरबरोबर नात्यात नसल्याचे सांगत त्याच्याबरोबर नात्यात राहणं अत्यंत कठीण आहे असं सांगितलं होतं. दरम्यान सावरिया या चित्रपटानंतर या दोघांनी ‘संजू’ या चित्रपटात एकत्र काम केलं. 

दोन आठवड्यात पूनम पांडेचं लग्न तुटण्याच्या मार्गावर, पतीवर शोषण आणि मारण्याचा आरोप

नंदिता महतानी

डिझाईनर नंदिता महतानी ही रणबीरची लहानपणापासूनची क्रश होती असं म्हटलं जातं. या दोघांनी एकमेकांना बरीच वर्ष डेट केलं. मात्र या दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर होतं. नंदिता ही रणबीरपेक्षा 10 वर्षांनी मोठी असल्याने या नात्याला काहीच अर्थ राहिला नाही आणि हे नातं तुटलं. नंदिता आणि रणबीरने पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही. 

बालपणापासून करावा लागला संघर्ष, असा आहे स्वरसम्राज्ञी लता दीदींचा जीवनप्रवास

दीपिका पादुकोण

सर्वात जास्त रणबीरचं गाजलेलं नातं म्हणजे दीपिका पादुकोणसह. हे नातं गाजण्यासाठी महत्त्वाचं कारण ठरला तो रणबीरच. दीपिकाबरोबर नात्यात असतानाच रणबीर डबल डेट करत होता आणि त्याचवेळी त्याने कतरिना कैफबरोबरदेखील आपलं सुत जुळवायला सुरूवात केली होती. दीपिकाने तर रणबीरच्या नावाचा टॅटूही करून घेतला होता. मात्र रणबीरने फसवल्यानंतर दीपिकाला खूपच त्रास झाला होता. मात्र अजूनही दीपिका आणि रणबीर चांगले मित्र आहेत. 

ड्रग्ज संदर्भात अभिनेत्रींनी केले हे धक्कादायक खुलासे

कतरिना कैफ

या सगळ्यात सर्वात जास्त काळ रणबीरचं नातं टिकलं ते कटरिना कैफसह. कतरिना कैफ आणि रणबीर हे ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करत असताना एकमेकांच्या अधिक जवळ आले. त्यानंतर अनेक वर्ष दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र या दोघांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि दोघांच्या नात्यात दुरावा आला. कतरिनासह नाते हे रणबीरची आई नीतू यांनाही आवडले होते. इतकेच नाही तर दोन्ही कुटुंबाचीही बऱ्याचदा भेटही झाली होती. 

याव्यतिरिक्त पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, नर्गिस फाकरी आणि श्रुती हसन यांच्यासहदेखील जोडले होते. मात्र या अभिनेत्री केवळ आपल्या मैत्रिणी असून असं काहीही नसल्याचं रणबीरने स्पष्ट केलं होतं. आता रणबीर गेले दोन वर्ष आलिया भटसह नात्यात असून लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र आता येणारा काळच ठरवेल रणबीर लग्न करून आपली ही ‘कॅसानोव्हा’ इमेज बदलतो की नाही ते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक