ब्रम्हास्त्र'ची तयारी जोरात, व्हिडिओ झाला व्हायरल

ब्रम्हास्त्र'ची तयारी जोरात, व्हिडिओ झाला व्हायरल

धर्माचा अॅक्शनपटातील चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ हा सध्या चर्चेत आहे याची कारण अनेक आहेत. या टीमची स्टारकास्ट,कथा आणि इतके मोठे प्रोडक्शन हाऊस यामुळे हा चित्रपट सतत चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी निगडीत आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की, या चित्रपटाची जोरदार तयारी सुरु आहे.


वेबसिरीजनंतर सैफला लागले मालिकेचे वेड, करणार लवकरच एक मालिका


शिवाचे ट्रेनिंग जोरदार


तर या चित्रपटामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. तो पुराणातील एक काल्पनिक अॅक्शन हिरो साकारणार आहे. यात त्याचे नाव शिवा असे असून तो यासाठी बरीच मेहनत घेताना दिसत आहे. हा चित्रपट बिग बजेट असल्यामुळे सगळ्याच गोष्टी अगदी बिग बजेट आहेत. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटासाठी तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. गर्लफ्रेंड आलिया भटने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून अयान मुखर्जीने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.


काय आहे व्हिडिओमध्ये?

अयानने शेअर केलेला व्हिडिओ टाईमलॅप्समधील असून यात शिवाचे बारकावे टिपण्यात आले आहे. शिवाच्या बारीक सारीक गोष्टी कशा असतील याचे हे ट्रेनिंग दिसत आहे. तो कसा बसेल कसा वागेल? अशा स्वरुपातील हे ट्रेनिंग असून या व्हिडिओमध्ये आलिया भटसुद्धा दिसत आहे.


लेक कोमाला का गेलेत आलिया-रणबीर?


आलिया रणबीर युरोपला रवाना


alia ranbir


एकीकडे ब्रम्हास्त्रचे काम जोरदार सुरु आहे तर दुसरीकडे या चित्रपटाचे लीड स्टार आलिया आणि रणबीर सध्या सुट्टीच्या मोडमध्ये आहेत. सध्या ते युरोपमध्ये असून लेक कोमा येथे देखील जाणार असे कळत आहे. कामातून थो़डा वेळ काढून एकमेकांना वेळ देण्यासाठी त्यांनी ही टूर अरेंज केली आहे. आता ‘लेक कोमा’ म्हटल्यावर तुम्हाला काही आठवले का? हो  अगदी खरे आहे. ज्या ठिकाणी दीपिका आणि रणवीर सिंह विवाहबंधनात अडकले हीच ती जागा आहे.त्यामुळे आता हे दोघं गपचूप लग्न तर उरकत नाही ना? असा संशयही अनेकांना येऊ लागला आहे. पण आलियाच्या आईने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. 


तैमुरचा होतोय शेजाऱ्यांना त्रास केली तक्रार 


आलियाचा कलंक झाला फ्लॉप


kalank


आलियाने बॅक टू बॅक हिट चित्रपट दिल्यानंतर तिच्याकडून फारच अपेक्षा वाढल्या. पण तिचा आताच रिलीज झालेला ‘कलंक’ हा चित्रपट मात्र फार काही कमाई करु शकला नाही.  150 कोटीच्या या चित्रपटाने 100 कोटीचा गल्लाही जमवला नाही. त्यामुळे आलियाच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.


Soty2चं  काय होणार?


soty 2 fi


धर्मा प्रोडक्शनचा दुसरा चित्रपट soty2 हा शुक्रवारी रिलीज होत आहे. टायगर श्रॉफ, तारा सुतारीया आणि अनन्या पांडे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. पण या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर हा चित्रपटही फार काही चालेल असे वाटत नाही. त्यामुळे कलंक नंतर हा चित्रपटही डब्यात जातो की काय अशी शंका अनेकांना आहे.