संजय लीला भन्सालीला अखेर 'बैजू बावरा' सापडला, 13 वर्षानंतर करणार एकत्र काम

संजय लीला भन्सालीला अखेर 'बैजू बावरा' सापडला, 13 वर्षानंतर करणार एकत्र काम

संजय लीला भन्सालीसह काम करण्यासाठी अनेक कलाकार वाट पाहत असतात. संजय लीला भन्साली जेव्हा चित्रपट बनवतात तेव्हा ते चित्रपट अतिशय ग्रँड असतात आणि त्याची कथाही तितकीच सुंदर असते. मागच्या वर्षी दोन चित्रपटांची घोषणा संजय लीला भन्सालींनी केली होती. त्यापैकी एक आलिया भटसह ‘गंगूबाई काठियावाडी’चं चित्रीकरण सुरू झालं होतं. मात्र कोविडमुळे यामध्ये अडचण आली. मात्र लवकरच पुन्हा या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होईल. तर याशिवाय भन्साली क्लासिक बैजू बावरा चित्रपटाचाही रिमेक बनवणार आहे. बॉलीवूडमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. काही दिवसांपर्यंत ही भूमिका रणवीर सिंह साकारणार असे सांगण्यात येत होते. मात्र आता ही भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

स्टार असूनही या प्रसिद्ध अभिनेत्रीला द्यावी लागली ऑडिशन, शेअर केला अनुभव

चित्रपटात दोन महत्त्वाच्या भूमिका

बैजू बावरा हा चित्रपट संजय लीला भन्सालीला कधीपासून करायचा आहे. मात्र त्यासाठी मुख्य भूमिका नक्की कोण साकारणार यासाठी शोध चालू होता. याआधी ही भूमिका रणवीर सिंह करणार अशी बातमी होती. मात्र रणवीर सिंहच्या डेट्सचा गोंधळ असल्यामुळे आता ही भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटामध्ये दोन महत्त्वाच्या भूमिका आहेत. एक म्हणजे बैजू बावरा आणि दुसरा म्हणजे तानसेन. त्यामुळे आता रणवीर आणि रणबीर हे दोघेही या चित्रपटात दिसले तर आश्चर्य वाटून घ्यायला नको. हे दोन्ही कलाकार संजय लीला भन्साली यांचे आवडते कलाकार आहेत. त्यामुळे हा संगम दिसून आला तर प्रेक्षकांनाही नक्कीच आनंद होईल. 

रतन राजपूतचे पुनरागमन, संतोषी मातेच्या अंश रूपात मालिकेत येणार परत

13 वर्षांनंतर एकत्र काम करणार रणबीर आणि भन्साली

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैजू बावराची भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे. नुकताच रणबीर कपूर भन्साली यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा करून आल्याचीही माहिती मिळाली आहे. या चित्रपटाला रणबीर कपूरने होकार दिल्याचे कळले आहे. सावरिया या चित्रपटातून रणबीर कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात संजय लीला भन्साली यांनी रणबीरला पहिल्यांदा ब्रेक दिला. मात्र त्यानंतर दोघांनीही एकत्र काम केले नाही. आता 13 वर्षानंतर पुन्हा एकदा ही जोडी एकत्र काम करणार आहे. वास्तविक अजूनही बाकी कलाकारांच्या आणि रणबीरच्या डेट्स या चित्रपटासाठी निश्चित होत असल्याचं कळत आहे. 2021 च्या दिवाळीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भन्साली सर्वात आधी गंगूबाई काठियावाडीचे काम पूर्ण करणार आहेत आणि त्यानंतरच बैजू बावरा या चित्रपटाचं काम सुरू करण्यात येईल. तर रणबीर कपूरचेही दोन चित्रपटांवर काम सुरू आहे. त्यापैकी एक आहे लव रंजन याचा चित्रपट तर दुसरा चित्रपट आहे ‘कबीर सिंह’ फेम संदीप रेड्डी वेंगा याचा. त्यामुळे आता तरी बैजू बावरा लवकरच चित्रीकरण सुरू होईल रणबीरच या भूमिकेत दिसेल अशी अपेक्षा त्याचे चाहते करत आहेत. तर पुन्हा एकदा संजय लीला भन्साली आणि रणबीर कपूर या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर एकत्र पाहता येईल अशीही उत्सुकता आता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

बिग बॉसच्या नव्या टीझरचा नेमका अर्थ तरी काय?,येणार नवा सीझन

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा