सर्जरीनंतर पहिल्यांदाच रणदीप हुड्डाने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

सर्जरीनंतर पहिल्यांदाच रणदीप हुड्डाने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डावर काही दिवसांपूर्वीच एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामुळे काही दिवसांपासून तो आरामच करत आहे. शस्त्रक्रियेनंतर रिकव्हर होण्यासाठी हळूहळू व्यायामाला सुरूवात करावी लागते. कारण एकदम हेव्ही वर्कआऊट केल्यास जखमेवर याचा दुष्पपरिणाम होऊ शकतो. रणदीपदेखील आता हळू हळू रिकव्हर होताना दिसत आहे. कारण त्याने नुकताच त्याचा एक वर्कआऊट व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. ज्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये येत आहे हे दिसून येत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी खूप छान प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. 

सर्जरीनंतर रणदीप हुड्डा होतोय रिकव्हर

रणदीप हूड्डा सध्या सर्जरीनंतर आराम करत असला तरी तो सोशल मीडियावर पूर्वीप्रमाणेच अॅक्टिव्ह आहे. तो सतत त्याचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत अशतो. नुकताच त्याने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तो या मोठ्या सर्जरीनंतर पहिल्यांदाच व्यायाम करत आहे. यातून तो ठणठणीत आणि सुदढ असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओत त्याने पायांवर पट्टी बांधली आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी त्याच्या पायांवरच मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या व्हिडिओला रणदीपने कॅप्शन दिली आहे की, " माझ्या पायांवर मी पुन्हा परत आलो आहे यासाठी त्याने या कॅप्शनमध्ये त्याचा ट्रेनर शेन डिसूझा याची कृतज्ञताही व्यक्त केली आहे. रणदीपचा हा व्हिडिओ पाहून चाहते खूपच खुष झाले आहे. कारण त्याच्या व्हिडिओवर अनेक लाईक्स आणि कंमेटचा पाऊस पडत आहे. काही लोकांनी यावर कंमेट दिलू आहे की जाट इज बॅक तर काहींनी रणदीपला लवकर मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रणदीप या व्हिडिओमध्ये खूप खूष दिसत असल्यामुळे लवकरच बरा होईल आणि पुन्हा अभिनयाला सुरूवात करेल अशी आशा सर्वांना निर्माण झाली आहे. 

रणदीपवर का करण्यात आली होती शस्त्रक्रिया

ऑगस्ट महिन्यात रणदीपवर लेग सर्जरी झाली होती. सर्जरीसाठी तो ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल दाखल झाला होता तेव्हाही त्याचे फोटो व्हायरल झाले होते. तो त्याच्या वडीलांच्या मदतीने या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. कारण त्याचे वडीलदेखील एक डॉक्टरच आहेत. रणदीपच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्याच्या वाढदिवसांनंतर काहीच दिवसांमध्ये  रणदीप हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने सर्वांनाच चिंता वाटू लागली होती. ज्यामुळे चाहत्यांनी रणदीप बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आणि आता रणदीप पुन्हा रिकव्हर होऊ लागला आहे. रणदीपने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून काम केलं आहे. त्याने केलेल्या साहेब बिबी और गॅंगस्टर, लाल रंग, सरबजीत, वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई, जिस्म,किक, हायवे या चित्रपटांमझील भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहेत.रणदीपने एक्सट्रॅक्शनमध्ये साकारलेल्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं होतं. रणदीपने त्याच्या सक्षम अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळखच निर्माण केलेली आहे. रणदीप लवकर बरा व्हावा आणि त्याला पुन्हा चित्रपटात पाहता यावे अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.